मुंबई - मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळविण्यासाठी खोटे जातीचे सर्टिफिकेट दाखल केल्याचा गंभीर आरोप नवाब अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाकडे समीर वानखेडे यांची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने ( National Commission for Scheduled Castes ) मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना 31 जानेवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले ( NCSC asks Mumbai police chief to appear ) आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना लेखी समन्स जारी करताना ( NCSCS notice to Police commissioner ) एनसीएससीचे संचालक म्हणाले, चेअरमन विजय सांपला यांनी 31 जानेवारी रोजी लोकनायक भवन, नवी दिल्ली येथील त्यांच्या चेंबरमध्ये सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यानुसार, अद्ययावत केलेल्या कारवाईचा अहवाल आणि संबंधित फाइल्स, केस डायरीसह सर्व संबंधित कागदपत्रांसह सुनावणी सुलभ करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.
आयोगाकडे चौकशी प्रलंबित असेपर्यंत या प्रकरणी कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, अशी शिफारस एनसीएससीने राज्य सरकारला केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणामुळे ( Sameer Wankhede in Aryan case ) प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. मात्र, एनसीएससी ही समीर वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी करत आहे.
हेही वाचा-PM Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेतबाबत भाजप काँग्रेस कडून राजकारण - नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या खुलाशानंतर वानखेडे यांनी या प्रकरणावर आयोगाला पत्र लिहून त्रास दिल्याचा आरोप केला. वानखेडे हे मुस्लिम होते. त्यांनी अनुसूचित जातीचा असल्याचा दावा करून आयआरएसमध्ये नोकरी मिळवली होती, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्र्यांनी केला होता. वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा-Nawab Malik Latter to CM : प्रवीण दरेकरांवर फौजदारी कारवाई करा; मलिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. आता त्यांना DRI विभागाकडे पाठवण्यात आले आहे. मुंबई एनसीबीमध्ये झोनल डायरेक्टर पदावर येण्यापूर्वी समीर वानखेडे या विभागात होते. डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले. आता त्यांना पुन्हा डीआरआयकडे पाठवण्यात आले आहे.