ETV Bharat / city

कॉल सेंटरच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या संदर्भात एक पुरुष व पाच महिला आरोपींना अटक केली आहे.

कॉल सेंटरच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीला अटक
author img

By

Published : Jul 20, 2019, 1:52 PM IST

मुंबई -

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, या संदर्भात एक पुरुष व पाच महिला आरोपींना अटक केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ही टोळी वर्तमानपत्रात स्पा@युअर होम या नावाने मसाजची जाहिरात देत होती. यासाठी मसाज करून घेणाऱ्या ग्राहकांना कुठलाही पत्ता न पुरवता कॉल सेंटरचा नंबर देण्यात येत असे. संबंधित कॉल सेंटरला संपर्क साधल्यावर ग्राहकाला मसाजच्या माध्यमातून शरीरसुखासाठी महिला उपलब्ध करून देण्यासंबंधी माहिती पुरवण्यात येत असे. ग्राहकाशी यासंदर्भात तडजोड झाल्यानंतर हॉटेल किंवा इतर गुप्त ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी पीडित महिलांना पाठवले जात होते.

कॉल सेंटरच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीला अटक

गुन्हे शाखेला खबर्‍यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीतून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत मुंबईतील साकीनाका परिसरातील पेनिनसुला ग्रँड हॉटेल व लोअर परेल परिसरातील मॅरेथॉन आयकॉन टॉवर या ठिकाणी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर मिळालेल्या माहितीतून अंधेरी परिसरातील कॉल सेंटरवर छापा मारण्यात आला. या छाप्यात कॉल सेंटरच्या जागेवरून पोलिसांनी चार लाख 70 हजार रुपये, काही ग्राहकांचे संपर्क क्रमांक असलेली डायरी, प्ले विन कॅप्सूलसह आधार कार्ड जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Intro:मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच ने कॉल सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी एक पुरुष व पाच महिला आरोपींना अटक केली आहे

Body:गेल्या काही महिन्यांपासून ही टोळी वर्तमानपत्रात स्पा@युअर होम या नावाने मसाजची जाहिरात देत होते. यासाठी मसाज करून घेणाऱ्या ग्राहकांना कुठलाही पत्ता न पुरविता कॉल सेंटरचा नंबर दिला जायचा . या कॉल सेंटरला संपर्क साधला असता यावर ग्राहकाला मसाज च्या माध्यमातून शरीरसुखासाठी महिला उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती दिली जायची. ग्राहकाशी यासंदर्भात तडजोड झाल्यानंतर हॉटेल व इतर गुप्त ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी पीडित महिलांना पाठवले जात होते.

Conclusion:क्राइम ब्रँच ला खबर्‍यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी तपास करीत मुंबईतील साकीनाका परिसरातील पेनिनसुला ग्रॅंड होटेल व लोअर परेल परिसरातील मॅरेथॉन आयकॉन टॉवर या ठिकाणी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली पीडित महिलांची सुटका केल्यानंतर या संदर्भात पोलिस चौकशी केली असता मिळालेल्या माहितीवरून अंधेरी परिसरातील कॉल सेंटरवर छापा मारला गेला. सदरच्या छाप्यात कॉल सेंटरच्या जागेवरून पोलिसांनी चार लाख 70 हजार रुपये , काही ग्राहकांचे संपर्क क्रमांक असलेली डायरी , प्ले विन कॅप्सूल सह आधार कार्ड जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.