मुंबई - जवळपास 100 कोटी रुपयांच्या वाहन कर्ज घोटाळ्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या दिलीप छाब्रिया यांच्या मुलाला व बहिणीला मुंबई पोलीसांकडून आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनितो व त्यांची बहीण कंचन व दिलीप छाब्रिया डिजाईन प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संचालक कोलिंगम काथीरावन, सेथरमान सेलवरा यांचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत.
कार डिजायणर दिलीप छाब्रिया यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू आणि बॉलिवूड मधील अभिनेत्यांना गाडीच्या विक्री संदर्भात फसवण्यात आल्यानंतर मुंबई पोलीसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट कडून तपास केला जात आहे. या संदर्भात दिलीप छाब्रिया यांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आतापर्यंत पोलीसांनी केलेल्या तपासा दरम्यान दिलीप छाब्रिया यांच्याकडून 127 अवंती कार बनवण्यात आलेल्या होत्या. या देशात व परदेशात विकण्यात आल्या होत्या. या पैकी 90 गाड्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारावर खाजगी वित्त संस्थांकडून कर्ज लाटण्यात आले होते.
एकच गाडी तामिळनाडू , हरीयाणात रजिस्टर -
पोलीसांनी आतापर्यंत केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीमध्ये एकच गाडी , तिच्या चेसी नंबर वर अनेक राज्यांमध्ये रजिस्टर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर कर्ज घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलीसांनी दिलीप छाब्रिया यांच्या कार वर्क शॉप वर छापा मारून तपासणी केली असता त्या ठिकाणी त्यांना आणखीन काही अवंती टू सीटर कार आढळून आल्या. या गाडीचा चेसी नंबर व इंजिन नंबर हा हरियाणा व तामिळनाडू या राज्यांमध्ये रजिस्टर असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनितो व त्यांची बहीण यांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात आहे.