मुंबई - मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Squad ) अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांकडून मानखुर्द भागातून 1 किलो चरस पकडण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 39 लाख 69 हजार रुपये इतकी किमत आहे. 17 फेब्रुवारी रोजी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपीला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दोघांना अटक -
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने वरळी येथील युनिटने ही कारवाई केली. या प्रकरणाची पहिल्या आरोग्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले. त्यानंतर आरोपीकडून तपास केला असता आरोपीने दुसऱ्या आरोपी होता सांगितल्यानंतर वरळी पथकाने गोवंडी परिसरातून आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. इक्बाल शेख (28) आणि जहांगीर खान (40) अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक केली आहे.
गुन्हा दाखल -
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने वरळी युनिटने अडीच किलो चरस जप्त करताना 2 अमली पदार्थ तस्करांना अटक केली. जप्त केलेल्या चरसची किंमत 39 लाख रुपये आहे. वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान पहिल्या आरोपीने माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून गोवंडी परिसरात त्या दुसर्या आरोपीला देखील अटक करण्यात आली. चरससह एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना मोठ्या प्रमाणात चरससह अटक केली. एन डी पी एस कायद्याच्या कलम 8 (c), 20 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Narayan Rane : सुशांतसिंग आणि दिशा सालियन यांची हत्या, नारायण राणे यांचे खळबळजनक ट्विट