ETV Bharat / city

Mumbai Omicron Update : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ५ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३६ वर

author img

By

Published : Dec 23, 2021, 10:13 PM IST

Updated : Dec 24, 2021, 12:57 PM IST

मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ५ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ५ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - नवजात बालक मृत्यू प्रकरण - बालकांचा मृत्यू इन्फेक्शनमुळे, पडसादानंतर पालिकेची चौकशी समिती नियुक्त

रुग्णांचा आकडा ३६ वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून ११ हजार २९५ प्रवासी आले. त्यापैकी ४८ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ७९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एनआयव्ही, पुणे ) येथे जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ३६ ( २१ पुरुष, १५ स्त्री ) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ३६ पैकी १९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

आज ५ रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह -

मुंबईत आज ओमायक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. आज आढळून आलेले ५ ही रुग्ण विमानतळावर तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना विमानतळावरून थेट रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा - आम्हाला विचारून रुग्णालयात दाखल केले का? आरोग्य समिती अध्यक्षांनी पालकांना दरडावले

Last Updated : Dec 24, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.