मुंबई - भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी विक्रमी मतदान घेत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रसने अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, जनतेने पुन्हा एकदा शेट्टी यांना संधी दिली आहे.
LIVE :
वेळ -
- 5.45 - गोपाळ शेट्टी - 688395, उर्मिला मातोंडकर 235201
- 4.23 - गोपाळ शेट्टी 640507, उर्मिला मातोंडकर 210147
- 4.21 - गोपाळ शेट्टी 576703, उर्मिला मातोंडकर 184930
- 3.30 गोपाळ शेट्टी ३ लाख ४६ हजार मतांनी आघाडीवर
- 3.30 - गोपाळ शेट्टी - 511350, उर्मिला मातोंडकर - 165298
- 2.54 - गोपाळ शेट्टी (भाजप) 428188, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 144307
- 2.24 - गोपाळ शेट्टी (भाजप) 365960, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 12013
- 2.02 - मतमोजणीच्या ७ फेरी पूर्ण
- 11.55 - गोपाळ शेट्टी (भाजप) 174173, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 60632
- 9.49 - सुनील थोरात (वंचित) 938 मतं
- 9.26 - गोपाळ शेट्टी १५ हजार मतांनी आघाडीवर, मालाड मालवणीत 4730 मते शेट्टींना तर 2791 मतदान उर्मिला यांना
- 8.05 - पोस्टल मतदान एकूण 1906, यामध्ये 79 सैनिक, तर 1827 कर्मचाऱ्यांनी केले मतदान
- 8.12 - गोपाळ शेट्टी आघाडीवर
- 8 - उत्तर मुंबई मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
- 7.30 - कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर दाखल
२०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ४६ हजार ५८२ मतांची आघाडी घेऊन गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. राज्यातील सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळवणाऱ्यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी एकमेव ठरले होते. याच गोपाळ शेट्टींसमोर आघाडीने उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अवघ्या महिन्याभरात उर्मिलाने जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असला तरी ४ लाख ४६ हजार मतांची आघाडी घेणारे गोपाळ शेट्टी हे उर्मिला यांच्या समोरचे मोठं आव्हान आहे. यावेळी या मतदारसंघात ५३.०७ टक्के मतदान झाले आहे.
पक्षीय बलाबल -
उत्तर मुंबई या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये ४ जागांवर भाजप आमदारांचे वर्चस्व आहे. तर, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातले दोन्हीही उमेदवार तुल्यबळ मानले जात आहेत. मात्र, उत्तर मुंबईच्या जनतेने कोणाला दिल्लीत पाठवले हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.