मुंबई - गणपती आगमनाच्या आधी शेवटचा रविवार असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होईल, या आशेवर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात वस्तू बाजारात आणल्या होत्या. मात्र, रविवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारपर्यंत अपेक्षित विक्री झाली नसल्याचे चित्र दिसून आले.
मुंबईच्या दादर भागात अनेक वर्षांपासून गणेशाच्या सजावटीच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी यावर्षी मात्र साहित्य विक्रीत घट झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे
रविवार असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होईल या आशेवर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात या वस्तू बाजारात आणल्या होत्या, पावसाच्या आगमनाने अपेक्षीत विक्री झाली नाही, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा... मुंबईत 'चंद्रयान 2' यानावर विराजमान झाला बाप्पा
हाच निरुत्साह संध्याकाळीही राहिल्याने यावर्षी विक्री सुमारे ३० टक्क्यापर्यंतची घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर गावाकडे बसवल्या जाणार्या गणपतीसाठी साहित्य खरेदी करायला येणारे ग्राहकही यावर्षी बाजारात फिरकले नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा... बीडमध्ये महिलांनी पुढाकार घेत स्थापन केले गणेश मंडळ
कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुराने नुकसान झालेले आहे. दरवर्षी या भागातील नागरिक गावाला घेऊन जाण्यासाठी साहित्य खरेदी करायला दादरच्या बाजारात येतात. मात्र हे मुंबई बाहेरील ग्राहक बाजारात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मागील वर्षी एवढ्याही व्यवसाय होत नसून विक्री २५ ते ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे वस्तूच्या मागे मिळणाऱ्या नफ्यात ५० टक्के इतकी घट करून विक्री करत आहेत. अशी व्यथा दादर परिसरातील विक्रेते लक्ष्मण भागोजी चैकुळकर व अंकुश सखाराम कदम यांनी व्यक्त केली.