ETV Bharat / city

मुंबई पालिकेचे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष - प्रजा फाऊंडेशनचे निरीक्षण

author img

By

Published : Jun 9, 2021, 9:53 AM IST

मुंबई पालिकेचे कोरोनावर लक्ष केंद्रीत करताना मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या निरीक्षणातून समोर आले आहे. प्रजा फाऊंडेशनने ‘मुंबईतील नागरी सेवांबाबतची सद्यस्थिती’ या अहवालाचे प्रकाशन केले. त्यात, २०२०-२१ मधील पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे.

Breaking News

मुंबई - मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला तेव्हापासून पालिकेने प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मुंबई पालिकेने हाती घेतलेले उपाय, तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार आदी सर्व स्तरावर पालिकेने उत्तम कामगिरी बजावली. मात्र, या कालावधीत कोरोनावर लक्ष केंद्रीत करताना मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या निरीक्षणातून समोर आले आहे.

पाण्याच्या पुरवठ्यामध्ये विषमता

प्रजा फाऊंडेशनने ‘मुंबईतील नागरी सेवांबाबतची सद्यस्थिती’ या अहवालाचे प्रकाशन केले. त्यात, २०२०-२१ मधील पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. मुंबईत दर दिवशी दरडोई सरासरी १८८ लीटर पाणीपुरवठा होत असून, ते प्रमाण भारतीय मानकाच्या दरडोई १३५ लीटर पाणीपुरवठ्यापेक्षा अधिक आहे. मात्र शहरी आणि झोपडपट्टी भागात पाण्याच्या पुरवठ्यामध्ये विषमता असल्याचे प्रजा फाऊंडेशनने नमूद केले आहे. झोपडपट्टी भागात मीटरवर आधारित पाणीपुरवठा केल्यास तिथल्या रहिवाशांना मोठा आधार मिळेल, असेही स्पष्ट केले आहे.

झोपडपट्टीत नळाने पाणी द्या

पाण्याच्या समस्येबाबतही अहवालात काही निरीक्षणे प्रजाने नोंदवले आहेत. बिगर झोपडपट्टी क्षेत्रात दरडोई सरासरी १५० लीटर पाण्यासाठी महिना १९.४४ रु. दराने पाणीपुरवठा होतो. तर, झोपडपट्टी क्षेत्रात हेच प्रमाण ४५ लीटर पाण्यासाठी ४.८५ रु. इतके दर आहे. तसेच, झोपडपट्टीतील मागणीनुसार पाणीपुरवठा होण्यासाठी तिथल्या रहिवाशांना टँकर किंवा अन्य उपायांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे प्रजा फाऊंडेशनने म्हटले आहे. पाणी पुरवठ्यासाठी प्रतिमाह ५०० ते ५५० रुपये इतका ज्यादा खर्च करावा लागतो. त्याऐवजी पालिकेने या भागात नळजोडणीने दरडोई सरासरी १३५ लीटर पाणीपुरवठा मीटर नळजोडणीने दिल्यास हा खर्च १४.५४ रुपये इतका येऊ शकतो, अशी तुलनाही करण्यात आली आहे.

कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी

स्वच्छ मुंबईसाठी मुंबई पालिकेने २०१९-२० पर्यंत घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उदिष्ट्य १०० टक्के पूर्ण केल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. हा दावा प्रजा फाउंडेशनने खोडून काढला आहे. २०२० मध्ये घन कचरा व्यवस्थापनाकडून कचरा उचलला जात नसल्याच्या ३४ टक्के इतक्या तक्रारी दाखल झाल्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अस्वच्छ शौचालये असल्याच्या तक्रारी

डिसेंबर २०२० मध्ये सार्वजनिक शौचालयांची तुलना केली असता, त्यात चार शौचालयांमागे महिलांसाठी एक शौचालय असल्याचे म्हटले आहे. मात्र, शौचालय अस्वच्छ असल्याच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अंतिम निकालानुसार कोणतेही शौचालय वापरण्यायोग्य वा गलिच्छ होते, असे आढळून आले नाही. मात्र, अस्वच्छ शौचालयांविषयीच्या तक्रारी २०१९ मध्ये २५५ आणि २०२० मध्ये २२७ इतक्या होत्या, याकडे प्रजाने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा - मान्सूनचे मुंबईत आगमन, दमदार पावासाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.