मुंबई - कोरोना महामारीने मुंबईतील आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर 5 हजार बेडचे कायमस्वरूपी संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अगदी 10 दिवसातच या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पालिकेने जागा संपादित करण्यासाठी आज (गुरुवार) निविदा काढली आहे. त्यानुसार उपनगरात पश्चिम द्रुतगती मार्गालगत वा पूर्व द्रुतगती मार्गालगत 20 एकर जागा पालिकेला हवी आहे. त्यासाठी जमीन मालक, बिल्डर यांच्याकडून निविदा मागवल्या आहेत.
मुंबईत संसर्गजन्य आजारावरील एकमेव कस्तुरबा रुग्णालय आहे. कोरोना महामारीत मुंबईत बेड, रुग्णालय आणि मनुष्यबळ कमी असल्याचे प्रकर्षाने पुढे आले. त्यामुळे 20 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत उपनगरात 5 हजार बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार जागा शोधण्याचे आदेशही दिले. या आदेशानुसार पालिका त्वरित कामाला लागली आहे. गुरुवारी पालिकेने 5 हजार बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी जागा संपादित करण्याच्या उद्देशाने एक निविदा काढली आहे. या निविदेनुसार उपनगरात पालिकेला यासाठी 20 एकर जमीन हवी आहे, तर ही जमीन पूर्व द्रुतगती मार्गालगत वा पश्चिम द्रुतगती मार्गालगत हवी आहे. या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण नसावे, जमिनीचे टायटल क्लियर असावे यासह अनेक अटी या निविदेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांना यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी जागा संपादित करण्यासाठी इच्छुकांकडून निविदेच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत, असे 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे. हे अर्ज आल्यानंतर त्यांची छाननी करत काही जागा निश्चित केल्या जातील. त्यानंतर जागेची प्रत्यक्ष पाहणी करत जागा अंतिम करण्यात येईल. पुढे नियमानुसार प्रक्रिया पार पाडत जमीन संपादित केली जाईल असेही ते म्हणाले. एकूणच आता जागेचा शोध सुरू झाल्याने 5 हजार बेडच्या रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने पालिकेने पहिले पाऊल उचलले आहे असे म्हणता येईल.
5 हजार बेडच्या रुग्णालयासाठी पालिकेला 20 एकर जागेची गरज
कोरोना महामारीने मुंबईतील आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर 5 हजार बेडचे कायमस्वरूपी संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अगदी 10 दिवसातच या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पालिकेने जागा संपादित करण्यासाठी आज (गुरुवार) निविदा काढली आहे.