मुंबई - राज्यातील परिस्थिती आणि झालेली राजकीय उलथापालथ ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. या राजकीय घडामोडींना काहीही अर्थ नाही अशा पद्धतीने राजकारण करणे योग्य आहे हा महाविकास आघाडी सरकारचा ( Mahavikas Aghadi government ) विश्वासघात आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे. तांत्रिकदृष्ट्या व्हीप नाकारणे अयोग्य शिवसेनेने आमदारांना सभागृहात बजावलेला व्हीप आमदारांनी झुगारून विरोधी पक्षाला मतदान केले आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे या संदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला नक्की न्याय मिळेल अशी भूमिका भाई जगताप ( Bhai Jagtap ) यांनी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ( Mumbai Municipal Corporation Election ) काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. राज्यातील परिस्थिती काहीही असली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुका आम्ही यापूर्वी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयावर कायम आहोत असेही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला ९९ मते पडली. त्यामुळे गेली दहा दिवसांहून अधिक चाललेली सत्तानाट्य हे संपुष्टात आले आहे. विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे गेले. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
22 आमदार गैरहजर - बहुमत चाचणी प्रक्रियेदरम्यान एकूण 22 आमदार गैरहजर राहिले. यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे.कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सहभागी झाले. विधानसभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसला तरी सत्ताधारी पक्षाची १६४ ही संख्या कायम राहिली आहे. विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची 8 मते कमी झाली आहेत. 107 मते विरोधीपक्षाकडे होती. आज विरोधी पक्ष 99 वर थांबला आहे. 5 काँग्रेस आमदार अनुपस्थित राहिले आहेत. आज ही सपा आणि तटस्थ राहिले आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर, विजय वडेट्टीवार, झिशांत सिद्दीकी, धिरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी हे मतदानाला अनुपस्थित राहिले आहेत.