ETV Bharat / city

'बेस्ट'च्या वीज दरवाढीला काँग्रेसचा विरोध - मुंबई महानगरपालिका

महागाईमुळे नागरिक आधीच होरपळून निघत आहेत. स्वयंपाकाचा गॅसची दरवाढ सतत होत आहे. त्यातच आता मुंबईकरांना बेस्टच्या दरवाढीचा शॉक बसणार आहे. मात्र, काँग्रेसने या दरवाढीचा विरोध केला असल्याचे विराधी पक्ष नेते आणि बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले आहे.

Ravi Raja congress
रवी राजा काँग्रेस
author img

By

Published : Jan 31, 2020, 9:05 PM IST

मुंबई - वीज निर्मिती व विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने बेस्टने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तसा प्रस्ताव बेस्टने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) मंजुरीसाठी पाठवला आहे. एमईआरसीच्या वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर बोजा पडणार असल्याने त्याला आमचा विरोध आहे, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... जयप्रभा स्टुडिओ विभाजन प्रस्ताव मान्य करू नका, स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाची पालिकेकडे मागणी

सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणारा विद्युत विभाग, अशी बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मुंबई शहरात पुरवठा करणाऱ्या बेस्ट विद्युत विभागाचा वीज दर अन्य वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक व ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पॅावरकडून ९०० मेगावॉट वीज खरेदी करते. मात्र वीज खरेदी ट्रान्समिशन खर्चात वाढ झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या खर्चातही वाढ झाल्याने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव एमईआरसीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. दरम्यान, एमएमआरसीने वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून वीज दरवाढ केली जाणार आहे.

हेही वाचा... 'काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहा'

वीज दरवाढीला विरोध...

बेस्टने एमईआरसीकडे ७ टक्के दरवाढीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार १००, ३००, ५०० च्या वर २० ते २५ पैशांपासून दीड रुपयांची दरवाढ होणार आहे. आज सामान्य नागरिक ३०० युनिट वीज वापरतात. २५ पैशांची दरवाढ झाल्यास प्रत्येकाला ३०० ते ३५० रुपये जास्त बिल येणार आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर बोजा पडणार आहे. त्यामुळे या दरवाढीच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे, असे पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा.... दिल्ली निवडणूक : भाजपचे 'संकल्प पत्र'.. गरीबांना 2 रुपये प्रति किलो दराने मिळणार गव्हाचे पीठ

अशी असेल दरवाढ

युनिट सध्याचे दर वाढीव दर
० ते १०० २ रुपये ९३ पैसे ३ रुपये ८ पैसे
१०१ ते ३०० ५ रुये १८ पैसे ५ रुपये ४४ पैसे
३०१ ते ५०० ७ रुपये ७९ पैसे ८ रुपये १८ पैसे
५०१ ते १००० ९ रुपये २ पैसे ९ रुपये ६६ पैसे

Intro:मुंबई - महागाईमुळे नागरिक आधीच होरपळून निघत आहेत. स्वयंपाकाचा गॅसची दरवाढ सतत होत आहे. त्यातच आता मुंबईकरांना बेस्टच्या दरवाढीचा शॉक बसणार आहे. वीज निर्मिती व विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने बेस्टने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचे प्रस्ताविले आहे. तसा प्रस्ताव बेस्टने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) मंजुरीसाठी पाठवला आहे. एमईआरसीच्या वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर बोजा पडणार असल्याने त्याला आमचा विरोध आहे अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले. Body:सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणारा विद्युत विभाग अशी बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मुंबई शहरात पुरवठा करणा-या बेस्ट विद्युत विभागाचा वीज दर अन्य वीजपुरवठा करणा-या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक व ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पॅावरकडून ९०० मेगावॉट वीज खरेदी करते. मात्र वीज खरेदी ट्रान्समिशन खर्चात वाढ झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या खर्चातही वाढ झाल्याने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव एमईआरसीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. दरम्यान, एमएमआरसीने वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून वीज दरवाढ केली जाणार आहे.

वीज दरवाढीला विरोध -
बेस्टने एमईआरसीकडे ७ टक्के दरवाढीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार १०० ३०० ५०० च्यावर २० ते २५ पैशांपासून दिड रुपयांची दरवाढ होणार आहे. आज सामान्य नागरिक ३०० युनिट वीज वापरतात. २५ पैशांची दरवाढ झाल्यास प्रत्येकाला ३०० ते ३५० रुपये जास्त बिल येणार आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर बोजा पडणार आहे. यामुळे या दरवाढीच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे, असे पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले आहे.

अशी असेल दरवाढ --
० ते १०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
२ रुपये ९३ पैसे - ३ रुपये ८ पैसे
---
१०१ ते ३०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
५ रुये १८ पैसे - ५ रुपये ४४ पैसे
-----
३०१ ते ५०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
७ रुपये ७९ पैसे - ८ रुपये १८ पैसे
----
५०१ ते १००० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
९ रुपये २ पैसे - ९ रुपये ६६ पैसे

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.