ETV Bharat / city

मुंबई मेट्रोचे सहार स्थानक प्रगतिपथावर; नवीन व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंचा कामाचा सपाटा

महाराष्टात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप काळातील जुन्या कामांना पुन्हा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ( Mumbai Metro Rail Corporation ) अश्विनी भिडे यांची नेमणूक झाल्यानंतर, त्यांनी मेट्रोच्या कामांचा सपाटाच चालू केला आहे. अश्विनी भिडे यांनी नुकतेच मेट्रो रेल्वे स्थानक सहार येथे भेट ( Sahar Station of Mumbai Metro ) दिली. प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रो रेल्वेसाठीचा रेल्वे मार्ग कसा बांधला जात आहे. त्याचे निरीक्षण करीत कंत्राटदाराला सूचनासुद्धा केल्या.

Mumbai Metro Rail Corporation,
मुंबई मेट्रो रेल
author img

By

Published : Jul 28, 2022, 2:15 PM IST

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ ( Mumbai Metro Rail Corporation ) व्यवस्थापकीय संचालकाच्या पदावर ( Managing Director ) नियुक्ती झाल्यावर आयएएस अश्विनी भिडे ( IAS Ashwini Bhide ) यांनी नियमितपणे मेट्रो कामांना भेटी देऊन त्याचा आढावा घेण्याचा सपाटा लावला आहे. नुकतेच त्यांनी मुंबई मेट्रोचे सहार रेल्वे स्थानक ( Sahar Station of Mumbai Metro ) येथे भेट दिली असता विविध कामांची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर त्यांनी कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, ज्या ठिकाणी सुधारणेला वाव आहे, त्याबाबत त्यांनी अभियंत्यांना सूचनादेखील केल्या. पाहुया सविस्तर वृत्तांत मेट्रो रेल्वे टप्पा तीनबाबत

मुंबई रेल्वेला नेहमीच तुफान गर्दी : याबाबत मुंबई मेट्रोचा अपडेट व्हिज्युअल देत आहे. अश्विनी भिडे यांचा फोटो नवीन कामाचे अपडेट फोटोदेखील जोडीत आहे. मुंबईत सुमारे ७० लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांचा लोकल रेल्वेवर प्रचंड ताण येतो. अतोनात गर्दी होते. लोकलमध्ये उभे राहायलादेखील जागा राहत नाही. काही ठिकाणी गर्दीमुळे अपघाताच्या घटनादेखील घडतात. तसेच मुंबई शहर असो नाहीतर उपनगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी हमेशा होत असते.

Metro Rail Corporation, IAS Ashwini Bhide
मुंबई मेट्रो रेल व्यवस्थापकीय संचालक

मुंबई रेल्वेला उपाय म्हणून मेट्रो आणली : त्यावर उपाय म्हणून मेट्रो रेल्वे आणली. आता मेट्रो रेल्वे टप्पा -३ याचे नेतृत्व अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा दिले आहे. नुकतेच अशिनी भिडे यांनी मेट्रो रेल्वे स्थानक सहार येथे भेट दिली. प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रो रेल्वेसाठीचा रेल्वे मार्ग कसा बांधला जात आहे. त्याचे निरीक्षण करीत, कंत्राटदाराला काही मौलिक सूचनादेखील त्यांनी केल्याची तसेच सहार रोड मेट्रो स्थानकाचे ७९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.

Mumbai Metro Rail Corporation,
मुंबई मेट्रो रेल

मुंबई मेट्रो रेल व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विनी भिडे : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा पुन्हा एकदा आश्विनी भिडे यांच्याकडे नुकताच सोपवण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा कार्यभार आश्विनी भिडेंकडे सुपूर्द करीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही अश्विनी भिडे यांच्याकडेच आहे. विशेष म्हणजे आधीच्या फडणवीस सरकारच्या काळातही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर ही जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडून काढून घेण्यात आली होती.

पुन्हा जबाबदारी दिल्याने मेट्रोच्या कामांना वेग : आता पुन्हा ती जबबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. सातत्याने त्यांनी विविध मेट्रो स्थानकांना भेटी दिल्या देत आहेत. त्याचा आढावा घेत आहे. राहिलेले काम प्रगतिपथावर कसे जाईल, बाबत दक्ष राहून दिशा देत आहेत.

हेही वाचा : दुबईतून परतलेल्या अभियंत्याचा अभिनव उपक्रम; माहुली जहागीर येथील शेतात ब्रह्मसागाचे विक्रमी उत्पादन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.