ETV Bharat / city

मेट्रो प्रगत प्रकल्पाचे काम सुसाट, प्रगती अहवाल सादर, 75 टक्के काम प्रगतीपथावर

मेट्रो प्रगत प्रकल्पाचे काम सुसाट सुरू आहे. मुंबई मेट्रो महामंडळाच्या संचालक अश्विनी भिडे यांनी पुन्हा या पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपली प्रशासनिक चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. गणपती उत्सवापूर्वी मेट्रो बाबतची प्रायोगिक चाचणी देखील केली. 75 टक्के काम प्रगतीपथावर असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो रेल्वे महामंडळाने हा प्रगती अहवाल सादर केला आहे. ट्विटरवर याबाबत संक्षिप्त अहवाल सादर केला आहे.

author img

By

Published : Sep 14, 2022, 10:09 PM IST

मेट्रो प्रगत प्रकल्पाचे काम सुसाट
मेट्रो प्रगत प्रकल्पाचे काम सुसाट

मुंबई - मुंबई मेट्रो रेल्वे टप्पा 3 अत्यंत वेगाने साकारला जात आहे. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक कामांना मंजुरी दिली गेली. केंद्र शासनाने देखील सर्व पातळीवरील मंजुरी दिली गेली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या बाबत आरे कारशेड संदर्भात वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मात्र शासनाने मेट्रो संदर्भात शासनाचे निर्णय आणि भूमिका योग्य असल्याचे म्हणत जोरदार प्रायोगिक चाचणी उद्घाटन सोहळा देखील केला. गणपती उत्सवापूर्वी मेट्रो बाबतची प्रायोगिक चाचणी देखील केली (Mumbai metro project work progress). एकूणच आतापर्यंतची प्रगती किती झाली हे सांगणारी माहिती समोर आली आहे. मेट्रो रेल्वे महामंडळाने हा प्रगती अहवाल सादर केला आहे. ट्विटरवर याबाबत संक्षिप्त अहवाल सादर केला आहे.

मुंबई मेट्रो महामंडळाच्या संचालक अश्विनी भिडे यांनी पुन्हा या पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपली प्रशासनिक चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. वेळोवेळी अद्ययावत माहिती आणि प्रकल्पाला दिशा देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. नुकतेच मेट्रो रेल्वे महामंडळाकडून मेट्रो रेल्वे - 3 बाबत 31 ऑगस्ट2022 पर्यंत ची प्रगती कुठपर्यंत झाली याची माहिती दिली.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 2023 च्या अखेरपर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल परंतु याच्या कामाचे जे टप्पे आहे. त्याच्या प्रगती संदर्भात एक रिपोर्ट कार्ड संचालिका अश्विनी भिडे यांनी प्रस्तुत केले आहे.सिव्हिल वर्क 86 टक्के काम पूर्ण झाले आहे. नागरी रेल्वे स्थानक जे आहेत त्यांचे 85 टक्के काम पूर्ण झालेत .तर ज्या ज्या ठिकाणी भुयारातून मेट्रो रेल्वे जाणार आहे. तेथील 99टक्के काम प्रगतीपथावर आहेत. तर एकूणच सर्व कामांच्या संदर्भात चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्ग जे आहेत त्याची जोडणी इत्यादी करणे त्याबद्दलचे 38 टक्के काम पूर्ण आणि संपूर्ण प्रकल्प मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प 3 हा 75 टक्के प्रगतीपथावर आहे असे रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.