ETV Bharat / city

Mira Bhayander मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी, युवक काँग्रेसची कारवाईची मागणी - मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी

मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. या अगोदर देखील या कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचं दिसून आले आहे. रविवारी मध्यरात्री सिल्व्हर पार्क परिसरात एका तरुणांशी वाद झाला. चक्क त्या तरुणांच्या अंगावर क्रेन चढवण्याचा प्रयत्न मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम बंद congress worker action against Metro line 9 worker in Mira Bhayander पाडलं.

congress worker
congress worker
author img

By

Published : Aug 22, 2022, 1:22 PM IST

मीरा भाईंदर - मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. या अगोदर देखील या कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचं दिसून आले आहे. रविवारी मध्यरात्री सिल्व्हर पार्क परिसरात एका तरुणांशी वाद झाला. चक्क त्या तरुणांच्या अंगावर क्रेन चढवण्याचा प्रयत्न मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम बंद congress worker action against Metro line 9 worker in Mira Bhayander पाडलं.

मीरा भाईंदरमध्ये मेट्रो ९ चे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. या मेट्रोच्या कामांमुळे अनेक गोष्टींचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी, काम सुरू असल्याने रस्त्यावर साचलेले चिखल खड्डे, मध्यरात्री एकतर्फी रस्ता, अनेक ठिकाणी रस्त्यावर साहित्य असल्याने रेडियम लावण्यात आले नाही. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होता आहेत. अश्या अनेक गोष्टींच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मागील अनेक दिवसांत मेट्रो कर्मचाऱ्याच्या तक्रारी मध्ये वाढ झाली आहे. वीस दिवसांपूर्वी एका पत्रकारावर मेट्रो कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तर, पत्रकारावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री एक तरुण कामावरून घरी जात असताना मेट्रोचे क्रेन रस्ता अडवून जात असल्याने विचारपूस केली. तेव्हा त्या तरुणाच्या अंगावर क्रेन चढवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रसारमांशी संवाद साधताना

या प्रकरणाची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कर्तव्यावर असलेल्या सुपरवायझर यांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. संबंधित क्रेन चालक फरार झाला आहे. क्रेन चालकांला बोलावं अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, क्रेन चालकांचा पत्ता न लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रोचे काम बंद पाडले.

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कनकिया परिसरातील कार्यालयात गेले. तेव्हा मेट्रोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पळ काढला. यावेळी मिरारोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आम्हाला उद्या पोलिसांनी मिरारोड पोलीस ठाण्यात बोलवले आहे. मेट्रो अधिकाऱ्यांची उद्या भेट घेणार असून, कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत, कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, अशी माहिती सिद्धेश राणे यांनी दिली.

ज्या पद्धतीने मेट्रो कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यानुसार हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश मधून हे सर्व कर्मचाऱ्यांना कमी पैशात, कंत्राटी पद्धतीने ठेकेदार घेऊन येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी झाली पाहिजे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

मेट्रो कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरूच आहे. हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी आहे. यांच्या मूळगावी यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. पालिका व पोलीस, जे कुमार या सर्व यंत्रणेने वेळीच लक्ष घातले पाहिजे. मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी न थांबल्यास संपूर्ण काम बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांनी दिला

थेट अंगावर क्रेन घेऊन जाण्याची हिमंत होतेच कशी. हे सर्व आपल्या मूळगावी बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश येथून गुन्हे करून मुंबईत काम करायला येत असल्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांत मेट्रो कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अमित मोरे यांनी दिली. या संदर्भात मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचे प्रमुख अधिकारी दिलीप दवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा -Supriya Sule सरकारमधील वाचाळवीर आमदारांबाबत पंतप्रधान, गृहमंत्र्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.