ETV Bharat / city

Mumbai BMC : मुंबई मेट्रोने मालमत्ता कराचे ११७ कोटी थकवले, पालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस - Mumbai Metro property tax

मुंबई मेट्रोने (२०१३)पासून मालमत्ता कराचे ११७ कोटी ६२ लाख रुपये थकवले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर जप्तीची नोटीस बजावली आहे. (Mumbai Metro has not paid property tax) के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो
author img

By

Published : Mar 11, 2022, 10:16 AM IST

Updated : Mar 11, 2022, 10:22 AM IST

मुंबई - मुंबई मेट्रोने (२०१३)पासून मालमत्ता कराचे ११७ कोटी ६२ लाख रुपये थकवले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर जप्तीची नोटीस बजावली आहे. (Mumbai Metro property tax) के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे. यात आठ मेट्रो रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

मालमत्ता कर थकवला -

मुंबई महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. (Mumbai Municipal Corporation) जकात कर रद्द होऊन जीएसटी कर लागू झाला. यामुळे पालिकेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रोने (२०१३)पासून आतापर्यंत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. हा कर भरण्यासाठी पालिकेने मेट्रोला नोटीस बजावली होती.

आठ रेलवे स्थानकांचा समावेश -

पालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर गुरुवारी जप्तीची नोटीस बजावली. नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी. एन. नगर मेट्रो स्थानस, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे.

तर मालमत्ता जप्त होणार -

मालमत्ता कराची थकीत रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. या कालावधीत थकबाकीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यानंतरही कर न भरल्यास मलनिस्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे. अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल असे नोटीसीत म्हटले आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी आज होणार बैठक

Last Updated : Mar 11, 2022, 10:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.