ETV Bharat / city

आमचे सरकार 'त्या' व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवेल - महापौर पेडणेकर

बोरी मोहल्ला ठिकाणी खासगी विकासकाने रहदारीचे रस्ते बंद केले आहेत. याचा त्रास वर्षभर येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या व्यापाऱ्यांसाठी आधीच्या सरकारने काहीच केले नाही. मात्र आमचे सरकार या व्यापाऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

merchants
merchants
author img

By

Published : Jan 14, 2021, 5:25 PM IST

Updated : Jan 14, 2021, 5:36 PM IST

मुंबई - मुंबईमधील सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला परिसराला चोर बाजार म्हणून ओळख आहे. या ठिकाणी खासगी विकासकाने रहदारीचे रस्ते बंद केले आहेत. याचा त्रास वर्षभर येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या व्यापाऱ्यांसाठी आधीच्या सरकारने काहीच केले नाही. मात्र आमचे सरकार या व्यापाऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

'सरकार प्रश्न सोडवेल'

मुंबईमधील सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला चोर बाजारमधील व्यापाऱ्यांनी आज महापौर बंगल्यावर आंदोलन केले, या आंदोलनानंतर महापौर बोलत होत्या. मी वर्षभरापूर्वी महापौर झाल्यावर हे व्यापारी माझ्याकडे आले होते. इमारतमालक आणि भाडेकरी यांच्यात वाद आहे. विकासकाने रस्ते बंद केल्याने व्यापाऱ्यांना वळसा मारून ये-जा करावी लागते. गेले वर्षभर ते तो त्रास सहन करत आहेत. रस्ता पालिकेचा असल्याने अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिका आयुक्तांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगणार आहे. हे व्यापारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही भेटले आहेत. या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. आधीच्या सरकारने लक्ष दिले नाही. मात्र आमचे सरकार नक्की लक्ष देऊन हा प्रश्न सोडवेल, असे महापौरांनी म्हटले आहे. लवकरच या विभागाला भेट देणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

आंदोलन का?

सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला परिसरात असलेल्या चोर बाजारातील छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून चोरबाजार परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी आम्ही कुठे जायचे हा सवाल उपस्थित केला आहे. याठिकाणी हे व्यवसायिक मागील 50 ते 60 वर्षापासून पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत आहेत. परंतु त्यांना आता या ठिकाणाहून हटवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या ठिकाणी खासगी विकासकाने रहदारीचे रस्ते बंद केले आहेत. एक वर्ष झाला रस्ते बंद आहेत, पालिकेचे हे रस्ते असताना कोणी लक्ष देत नाही, असे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापौरांनी दिले होते आश्वासन

या व्यवसायिकांचे म्हणणे आहे, की टाळेबंदीपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्हांला आश्वासन दिले होते, की आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. परंतू अजूनही महापौरांनी काहीच हालचाल न केल्यामुळे त्यांना याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Last Updated : Jan 14, 2021, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.