मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत तिन्ही मार्गावरील रेल्वे ट्रॅक आणि रस्ते पाण्याने भरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र होते. आज मुंबईत पाऊस ओरसरला असतानाही ,रेल्वेने गाड्या सुरळीत चालू झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मात्र, पावसाच्या पाण्याचा परिणाम लोकलसेवेवर आजही होत आहे. अनेक गाड्या 20 ते 25 मिनिटाने उशिराने धावत असल्याने स्थानकात मोठी गर्दी होत आहेत. लोकल प्रवासादरम्यान धक्काबुक्की आणि गर्दीला सहन करत लोकं मेटाकुटीला आले असल्याचे चित्र आजही आहे.
रेल्वे प्रशासनाने लोकल आज रोजच्या आठवडीय वेळेनुसार बंद ठेवल्या आहेत. रविवारच्या वेळापत्रकानुसार विशेष गाड्या चालवून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासन सांगत आहे. पण रेल्वे गाड्या आजही मोठ्या प्रमाणात उशिराने येत आहेत व काही गाड्या रद्द होत आहेत त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी ते कल्याण तसेच कल्याण ते कर्जत, कसारा पर्यंत सतत लोकल सेवा विशेष गाड्या सोडून नियमित वेळेवर सुरू ठेवणे आवश्यक होते. पण काही विशेष गाड्या रेल्वेने सोडल्या आहेत. डोंबिवली, ठाणे, कल्याण या ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने म्हटले होते. पण स्थानकात लोकांची प्रचंड गर्दी पाहून रेल्वेने हे मनावर घेतल्याचे दिसत नाही.
काल मंगळवारी मुंबई उपनगर परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे आज बुधवारी पाच दिवसांपासून घरी थांबलेला प्रवासी वर्ग वाहतूक सुरळीत झाली असेल या उद्देशाने कार्यालयीन वेळेत बाहेर निघाला आहे. पण ठाणे, डोंबिवली, दिवा, कल्याण, कळवा, मुंब्रा, घाटकोपर, कुर्ला, दादर तसेच सिएसएमटी या रेल्वे स्थानकावर प्रावाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे आजचा प्रवास देखील प्रवाशांचा कठीण प्रसंगातूनच होईल असे आजही रेल्वे स्थानकात पाहून दिसत आहे.