मुंबई यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा सण गणेश जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान लोक मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला घरात आणतात. Mumbai Lalbagh Ganesha गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये बाप्पाचे नाव सर्वत्र ऐकू येते. अशात सर्वांची नजर लागलेली असते, ती मुंबईतील लालबाग परिसराकडे कारण, गणपती आणि लालबाग या परिसराच अतूट नातं आहे. त्यामुळे आता बाप्पाचं आगमन तोंडावर असताना या भागातील बाजारपेठा सुद्धा बाप्पाच्या आगमनासाठी सजल्या आहेत. नेमकी कशी आहे इथली परिस्थिती पाहुया.
बाजारपेठ बहरली याच भागात पारेख ब्रदर्स नावाने एक फार जुने दुकान आहे. या दुकानाचे सर्वेसर्वा योगेश पारेख यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या दुकानाला भेट दिली आणि त्यांच्याकडून एकूणच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना योगेश पारेख म्हणाले की, कोरोनामुळे आपली 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेली. तेव्हा तर सर्वच बंद होतं. सण, उत्सव काही साजरे करता आले नाहीत. पण, आता सर्व निर्बंध हटवल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. Mumbai Lalbagh Ganesha 2022 आणि, त्याचा परिणाम देखील या बाजारपेठ्यांवर दिसून येतोय. दहीहंडीनंतर आता गणपतीसाठी सजावटीचे सामान घेण्यासाठी आमच्याकडे मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून ग्राहक येत आहेत. सध्या सजावटीसाठी लागणाऱ्या कापडाला प्रचंड मागणी आहे. गणपतीसाठी लागणारे पडदे आणि झालर याच्या अनेक व्हरायटी सध्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे लोक देखील बरीच गर्दी करत आहेत.
मागील वर्षांपासून पडदे, झेंडे विक्री लालबाग मधील हे पारेख ब्रदर्स मागील अनेक वर्षांपासून पडदे, झालर, सजावटीचे कापडी साधने यांची विक्री करत आहेत. यासोबतच योगेश पारेख यांच्या दुकानात सर्वच राजकीय पक्षांचे झेंडे, शाल, पताका विक्रीसाठी उपलब्ध असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पारेख ब्रदर्स यांच्याकडून राजकीय झेंडे घेऊन जातात. या झेंड्यांसोबतच पारेख ब्रदर्स हे तिरंगा ध्वजाची देखील विक्री करतात. मात्र, ही मागणी काही ठराविक काळापूर्ती मर्यादित असते. तर, राजकीय झेंड्यांची मागणी ही नेहमी सुरूच असते, असे पारेख ब्रदर्स यांनी माहिती दिली आहे.
गणपती ही बुद्धीची शुभाची देवता दरम्यान याच लालबाग भागात मुंबईचा प्रसिद्ध असा लालबागचा राजा बसतो. त्यामुळे मुंबईतील या भागात मुंबईसह आजूबाजूच्या भागातील कानाकोपऱ्यातून लोक इथे गणपतीचे खरेदी करण्यासाठी येत असतात. हिंदू धर्मात गणपती ही बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे सदैव सुख समृद्धी असते असं म्हटले जाते.