ETV Bharat / city

राज्यात घडलेल्या घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक; अजित पवार म्हणाले...

मुंबई मनपाची आपतकालीन यंत्रणा झोपली होती. नालेसफाईचे काम फक्त कागदावर केले. या पापाचे धनी कोण?

राज्यात घडलेल्या घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक; अजित पवार म्हणाले...
author img

By

Published : Jul 2, 2019, 12:36 PM IST

मुंबई - राज्यात मंगळवार हा घातवार ठरला. मालाड, ठाणे, पुणे आणि नाशकात घडलेल्या अपघातांमध्ये एकूण ३० जणांचे जीव गेले. मुंबईत काही भागात तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटलेले पाहायला मिळाले. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अजित पवारांनी अतिवृष्टी आणि अपघातांचा मुद्दा उपस्थित केला.

प्रश्नोत्तरे रद्द करून अतिवृष्टी आणि अपघातांवर विधानसभेत चर्चा करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानभवनात केले. मुंबई स्मार्ट शहर करायला निघाले. मात्र, माणसे किड्यामुंगीसारखी मरताहेत. त्यामुळे कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

राज्यात घडलेल्या घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक; अजित पवार म्हणाले...

मुंबई मनपाची आपतकालीन यंत्रणा झोपली होती. नालेसफाईचे काम फक्त कागदावर केले. या पापाचे धनी कोण? मुंबई कोसळली. अमिताभ बच्चन, नवाब मलिक यांच्या घरात पाणी घुसले. गरीबांच्या झोपड्याचे काय? मुंबईला आता लष्कराच्या मदतीची गरज आहे. कामकाज स्थगित करा. मुंबई डुबत आहे. तिला वाचविण्याची गरज असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सत्ताधाऱ्यांवर केला.

दोन वर्षापूर्वी बांधलेली टाकी फुटून १५-१६ लोक गतप्राण झाले. सरकारच्या गलथान कारभारामुळे या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावर चर्चा झालीच पाहिजे, हवे तर २ दिवस अधिवेशन कालावधी वाढवा, असे जयंत पाटील म्हणाले. तर, मुख्यमंत्र्यांसाठी हेलिकॉप्टर किंवा बोट पाठवा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. दरम्यान, सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभा १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आली होती.

Intro:Body:MH_MUM_AjitPawar_Mumbai rains_Vidhansabha_7204684

मुंबई स्मार्ट शहर करायला निघाले. माणसं किड्यामुंगीसारखी मरताहेत. कामकाज बाजूला सारुन चर्चा करा: अजित पवार

मुंबई:स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अजित पवारांनी अतिवृष्टी आणि अपघातांचा मुद्दा उपस्थित केला.प्रश्नोत्तरं रद्द करुन अतिवृष्टी आणि अपघातांवर विधानसभेत चर्चा करा: अजित पवार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.