मुंबई - पावसाळ्यात समुद्राला भरती असताना मोठ्या पाऊसमुळे मुंबईत पाणी साचते. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होतात. अशावेळी समुद्र किनारी, ( (Going to beach is dangerous)) समुद्रात जाणे धोकादायक असते. यंदा पावसाळ्यातील २२ दिवस समुद्रात मोठी भरती ( wave height in Mumbai ) येणार आहे. त्यापैकी या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार ( hightide in Mumbai for six days ) असून नागरिकांनी काळजी घ्यावी ( Citizens should be careful ) असे, अवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईची तुंबई - समुद्रात भरती असताना पाण्याची पातळी वाढते. भरतीच्या वेळी समुद्रात उंच लाटा येतात. ४.५ मीटर पेक्षा उंच लाटा असल्यास त्याला मोठी भरती असे म्हटले जाते. मोठ्या भरतीच्या वेळी समुद्र किनारी किंवा समुद्रात जाणे धोकादायक असते. अशा वेळी मोठा पाऊस पडल्यास मुंबई शहरात पाणी साचते. मुंबईतील नाल्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात ( Rainwater in the sea ) सोडले जाते. त्याकरीता असलेल्या १८६ पातमुखांपैकी ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा ( below sea level ) खाली आहेत. तर १३५ पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. त्यामुळे भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते. हे पाणी समुद्रात सोडणे शक्य नसल्याने मुंबईची तुंबई होते.
समुद्राला मोठी भरती - मुंबई महापालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तब्बल २२ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात १३ ते १८ जून असे एकूण सहा दिवस मोठी भरती येणार आहे. त्यापैकी गुरुवारी १६ जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून लाटांची उंची ४.८७ मीटर असणार आहे. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्र किनारी ( Tourists not go to beach) जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगर महापालिकेने केले आहे.
सलग आठवडाभर भरती -
जून १३ रोजी सकाळी ११.०८ वाजता ४.५६ मीटर
जून १४ रोजी सकाळी ११.५६ वाजता ४.७७ मीटर
जून १५ रोजी दुपारी १२.४६ वाजता ४.८६ मीटर
जून १६ रोजी दुपारी १.३५ वाजता ४.८७ मीटर
जून १७ रोजी दुपारी २.२५ वाजता ४.८० मीटर
जून १८ रोजी दुपारी ३.१६ वाजता ४.६६ मीटर
हेही वाचा - 'राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त होणार'
हेही वाचा - School Starts in Mumbai : शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईत आजपासूनच शाळा सुरू