ETV Bharat / city

Aryan Khan Drugs Cruise Case : आर्यन खानच्या जामीनाच्या अटींमध्ये शिथिलता मिळावी; मुंबई उच्च न्यायालयात अर्ज

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने शुक्रवारी (10 dec) रोजी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी जामीन देता वेळी न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी म्हणून आर्यनकडून अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी (Hearing on Aryan Khan) होण्याची शक्यता आहे.

Aryan Khan
Aryan Khan
author img

By

Published : Dec 10, 2021, 10:53 PM IST

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने शुक्रवारी (दि.10) रोजी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी जामीन देता वेळी न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी म्हणून आर्यनकडून अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी (Hearing on Aryan Khan) होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा तपास हा एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्यामुळे आर्यनच्या एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयातील हजेरीला शिथिलता आणावी. तसेच दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाताना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने पोलिसांनी त्यांच्यावर अरेरावी करत असल्याचा दावाही त्याने अर्जातून केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीत शिथिलता आणण्याची मागणीही अर्जातून करण्यात आली आहे. या अर्जावर लवकरच न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.तसेच त्याच्या विरोधात काही पुरावे दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. एनसीबी कार्यालयात हजेरी लावणे, पारपत्र जमा करणे, परदेशात विनापरवानगी न जाणे, मीडियावर न बोलणे इ. चौदा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. एनसीबीने या प्रकरणात चौदाजणांना अटक केली होती. सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

काय आहे प्रकरण ?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा अशा २० जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीने सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी अटीशर्तींसह जामीन मंजूर केला. त्यातील एका अटीनुसार, आर्यनला एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत हजेरी लावणे बंधनकारक होते. त्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी आर्यनकडून कऱण्यात आली आहे.

हेही वाचा - Jagmitra Sugar Factory issue : मृत पावलेल्या व्यक्तीकडून धनंजय मुंडेंची जमीन खरेदी - किरीट सोमैय्यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.