ETV Bharat / city

Bhosari MIDC Land Deal Case : मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा - भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) यांची पत्नी मंदाकिनी खडसे ( Mandakini Khadse ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) आज (मंगळवार) रोजी मोठा दिलासा दिलेला आहे. मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा ( Mumbai High Court Relief to Mandakini Khadse ) दिला आहे.

मंदाकिनी खडसे
मंदाकिनी खडसे
author img

By

Published : Dec 7, 2021, 3:27 PM IST

मुंबई - भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात ( Bhosari MIDC Land Deal Case ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) यांची पत्नी मंदाकिनी खडसे ( Mandakini Khadse ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) आज (मंगळवार) रोजी मोठा दिलासा दिलेला आहे. मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा ( Mumbai High Court Relief to Mandakini Khadse ) दिला आहे.

या प्रकरणाची चौकशी ईडीने मागितली होती. अखेर न्यायालयाने मत स्पष्ट केले आहे. यात ईडीला चौकशी करायची असल्यास २४ तासांपूर्वी कल्पना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दर शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी असून तोपर्यंत अटकेपासून देखील खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जावरही आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

  • काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा - Omicron in Mumbai : मुंबईतील दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यातील रुग्णांची संख्या 10 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.