मुंबई: उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पहिल्या पत्नीचा थकवलेला 4 महिण्याचा देखभाल खर्च पुढील सुनावणीपर्यंत द्यावा असे आदेश दिले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीने देखभाल खर्च तसेच पुणे नागपूर या ठिकाणी राहण्याची सोय करून देण्यात यावी या मागणीसाठी याचीका दाखल केलेली आहे यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
नगराळे यांचा 2011मध्ये घटस्पोट झाला, तेव्हापासून त्यांच्या पत्नीला प्रति महिना 20 हजार रुपये देखभाल खर्च द्यावा असा आदेश कुटुंब न्यायालयाने दिला होता. नगराळे यांच्या पहिल्या पत्नीने 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयात देखभाली खर्च वाढून देण्यात यावा याकरिता याचिका केली होती या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे नगराळे यांच्या पत्नीच्या याचिकेनुसार प्रति महिना दीड लाख रुपये करण्यात यावा तसेच महाराष्ट्रातील पुणे किंवा नागपूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. दिगे यांनी विभक्त झालेल्या पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित देण्याचे आदेश नगराळे यांना दिले.या याचिकेवरील पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे.