ETV Bharat / city

Varvara Rao Get Relief : मुंबई उच्च न्यायालयाचा वरवरा राव यांना पुन्हा दिलासा, आत्मसमर्पणची मुदत 21मार्चपर्यंत वाढवली - भीमा कोरेगाव केस अपडेट

भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Varvara Rao Get Relief ) यांना उच्च न्यायालयाने ( Mumbai Highcourt ) दिलासा दिला आहे. आज वरावरा राव यांची आत्मसमर्पणाची मुदत 21 मार्चपर्यंत वाढवून ( Varvara Rao Relief Extends ) देण्यात आली असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

Varvara Rao Get Relief
Varvara Rao Get Relief
author img

By

Published : Mar 8, 2022, 5:25 PM IST

मुंबई - भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Varvara Rao Get Relief ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची आत्मसमर्पणाची मुदत 21 मार्चपर्यंत वाढ ( Varvara Rao Relief Extends ) देण्यात आली असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

वरावरा राव यांना दिलासा -

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातलेच्या आरोपी वरावरा राव यांना सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोर्टाकडून जामीन मिळाला होता. वरावरा राव यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार तसेच शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. भीमा कोरेगाव आरोपी वरावरा राव यांनी फेब्रुवारी 2021मध्ये उच्च न्यायालयाने त्याला मंजूर केलेल्या वैद्यकीय जामीनाची मुदतवाढ मिळावी, या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी वरावरा राव यांना 21 मार्चपर्यंत आत्मसमर्पणाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडत आहे.

जामीन अर्जाला एनआयएचा विरोध -

एनआयएच्यावतीने राव यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद कऱण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन अवधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएने केली.

काय आहे याचिका?

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले ८२ वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव यांना आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर करताना वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील निवासस्थाळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वरवरा रावयांच्यातीने दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - sanjay Raut on ED : ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.