ETV Bharat / city

मुंबई शहर सहकारी बॅंकेत कर्ज वाटपात मोठा आर्थिक घोटाळा; अधिकाऱ्यासह व्यापारी अटकेत - Mumbai Police Economical offences wing

मुंबई शहर सहकारी बॅंकेत कर्ज वाटपात मोठा आर्थिक घोटाळा आढळून आला ( Mumbai Police Economical offences wing ) आहे. बॅंकेची 96 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कर्जदारांनी तारण ठेवलेले बनावट दस्ताऐवज या गोष्टींकडे सीईओंनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच 56 कर्जदारांना व कंपन्यांना फसवणूक करून कर्ज वाटप ( Mumbai city co operative bank scam ) केले.

Mumbai Economical offences wing
मुंबई आर्थिक गुन्हे शाखा
author img

By

Published : May 18, 2022, 11:49 AM IST

मुंबई - मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ( Mumbai Police Economical offences wing ) शहर सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शिरगावकर (79) ( Former CEO Ramesh Vitthal Shirgavkar ) यांना बोगस कर्ज आणि फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. बँकेच्या 96 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

फसवणूक करून कर्जवाटप : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे माजी सीईओ रमेश विठ्ठल शिरगावकर (79) यांच्याशी संगनमत करून 11 कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट आणि कर्ज मिळवण्यासाठी बनावट बोगस मालमत्तेची कागदपत्रे सादर करणाऱ्या व्यापारी राजन विलास सावंत (41) यालाही अटक केली आहे. शिरगावकर यांच्यावर 56 कर्जदार व्यक्ती आणि कंपन्यांना फसवणूक करून कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे. मालमत्ता गहाण ठेवताना आरोपींनी मालमत्तेचे बनावट दस्तऐवज सादर केले, ज्यात त्यांची मूल्ये किमतीपेक्षा जास्त दाखवण्यात येते होती.

व्यापारी राजन सावंत चौकशीत दोषी : आरएस ग्रुपचे सावंत, प्रिंट इमेजचे मालक, यांनी सुरक्षा म्हणून लोअर परळमध्ये भाड्याने दिलेली मालमत्ता देऊ केली. शिवाय, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या थकीत कर्जाच्या संदर्भात योग्य तपासणी केली नाही. कंपनीचे स्टॉक स्टेटमेंट, कर्जदारांची यादी आणि टर्नओव्हरचे स्टेटमेंटदेखील CA प्रमाणित नव्हते. कर्ज अर्जानुसार, त्याचे उत्पन्न 0.45 कोटी रुपये होते, परंतु छाननी अहवालानुसार, ते सुमारे 0.39 कोटी होते.

बॅंकेच्या कर्जवाटपात मोठ्या प्रमाणात त्रुटी : कर्जाच्या फाईलमधून सहकारी संस्थेचे शेअर सर्टिफिकेट, गहाण ठेवण्यासाठी एनओसी आणि मंजूर इमारत आराखडा यासारखी कागदपत्रे गायब होती. बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक असलेल्या शिरगावकर यांनी स्पष्टपणे त्रुटींकडे दुर्लक्ष करून राजन आणि इतर 55 जणांना कर्ज मंजूर केल्याचे तपासादरम्यान समजले. बँक अधिकार्‍यांना पोलिसांना सांगितले की, 2014-15 मध्ये आरबीआय ऑडिटमध्ये निधीचा गैरवापर झाल्याची घटना उघड झाल्यानंतर बँकेतील अनियमितता समोर आली. अंतर्गत ऑडिटमध्ये असे आढळून आले की, 2018 च्या शेवटी 147 नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स होते.

हेही वाचा : नव्या प्रभाग रचनेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.