मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नील सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून नील सोमैया यांच्याविरोधात वसई येथील जमीन खरेदी प्रकरणात तपास सुरू केला असून आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदविले गेले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ईओडब्ल्यूने या प्रकरणात तक्रारदाराचे जबाब ही नोंदवले आहेत. नील सोमैया आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील ( PMC Bank scam ) आरोपी राजेश वाधवान यांच्यात संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नील सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - मुंबई पोलिसांनी नील सोमैया यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात EOW ने 7 लोकांचा जवाब देखील नोंदवला आहे. EOW ने या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले आहे जेणेकरून या प्रकरणाची तक्रार बारकाईने समजून घेता येईल. त्यामुळे नील सोमैया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधात केलेल्या कारवाईनंतर आता राज्य सरकार देखील भाजप नेत्यांनी विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार सामना रंगला आहे.
संजय राऊतांनी केलेले आरोप - किरीट सोमैया यांचा मुलगा नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदारी आहे. तसंच या प्रकल्पासाठी सोमैयांनी 400 कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता तसंच हे बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचंही राऊत म्हणाले होते. मात्र राऊतांचे हे सर्व आरोप सोमैया यांनी फेटाळले होते. नील वा माझा वाधवानशी संबंध नाही पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होते. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला आम्ही घाबरत नाही असे सोमैया म्हणाले होते. मात्र आता सोमैयांच्या मुलाची सुरु असणारी चौकशी आणि काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरती झालेली कारवाई यामुळे आता एकमेकांविरोधातील चौकशींची लढाई सुरु झाल्याच चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - Bandatatya Karadkar : बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली! महात्मा गांधींबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य