ETV Bharat / city

आर्यन खान प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल - एनसीबी

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी हा आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं.

गोसावी
गोसावी
author img

By

Published : Oct 18, 2021, 9:45 AM IST

Updated : Oct 18, 2021, 6:33 PM IST

पालघर- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. एनसीबीने किरण गोसावी हा आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं. यापैकी पालघरच्या एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडल्याप्रकरणी किरण गोसावीविरुद्ध केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे पोलीस आरोपी किरण गोसावीच्या मागावर असून त्याला कधीही अटक करण्यात येऊ शकते असे कळते.

माहिती देतांना पोलीस अधीक्षक

मलेशियात नोकरीचं आमिष -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावीने केली होती.

फेसबूकवरुन ओळख

नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

दोन वर्षापासून तक्रार -

आर्यन खान प्रकारणामधील पंच किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याची तक्रार केळवा पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती. किरण गोसावीने फसवणूक केल्याचा आरोप उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांनी केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात तत्कालिन पोलrस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वारस्य दाखवले नाही. आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहून आर्यन सोबत सेल्फीत असलेला व्यक्ती हाच आपली फसवणूक करणारा व्यक्ती असल्याचे तरुणांच्या लक्षात आले. फसवणूक झालेल्या या तरुणांनी पुन्हा केळवे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादवि कलम 420, 406, 465, 467, 471 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

के. पी. गोसावी नेमका कोण?

व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग केस : एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस

Last Updated : Oct 18, 2021, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.