ETV Bharat / city

Mumbai District Bank Election : मुंबई जिल्हा बँकेवर प्रविण दरेकरांची एकहाती 'सत्ता', 21 पैकी 21 जागांवर विजय - Mumbai District Bank Election result 2021

मुंबई जिल्हा सहकारी बँक निवडणूकीत ( Mumbai District Bank Election Result 2021 ) सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला 21 पैकी 21 जागा ( Pravin Darekar Sahakar Panel Win ) मिळाल्या आहे. १७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर 4 जागांसाठी काल मतदान झाले.

Mumbai District Bank Election
Mumbai District Bank Election
author img

By

Published : Jan 3, 2022, 12:14 PM IST

Updated : Jan 3, 2022, 12:54 PM IST

मुंबई : मुंबई जिल्हा सहकारी बँक निवडणूकीत ( Mumbai District Bank Election Result 2021 ) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने एकहाती ( Pravin Darekar Mumbai District Bank Election ) वर्चस्व राहिले आहे. सहकार पॅनलचा 21 पैकी 21 जागांवर विजय झाला आहे. 4 जागांसाठी काल मतदान पार पडले होते. तर 17 जागा यापुर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीवरुन ( Mumbai District Bank Election Result 2021 ) फार वावटळ उठले होते. बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मजुर या प्रवर्गातून ही निवडणूक लढवत असल्याने हा विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत यांनी याबाबत आवाज उठवला होता. दरम्यान, यापुर्वीच सहकार पॅनलच्या १७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर, काल उरलेल्या 4 जागांसाठी मतदान झाले. त्याचा आज निकाल हाती आला असून, चारही जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

विजयी झालेले उमेदवार

सहकार पॅनेल मधील महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री ताई पांचाळ, मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातुन विठ्ठलराव भोसले, प्रायमरी कन्जुमर संस्था मतदार संघातुन पुरुषोत्तम दळवी तर एन टी (NT) मतदार संघातुन अनिल गजरे विजयी झाले आहेत.

सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात राबवणार

निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय प्राप्त झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर ( Pravin Darekar On Mumbai District Bank Election Result ) म्हणाले की, मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या दिवसांत सहकार चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा मानस आहे. वास्तविक ही निवडणुक बिनविरोध होणार होती. मात्र, काही लोकांच्या हट्टामुळे ४ जागांवर निवडणूक घ्यावी लागली, असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयात 2 आठवडे व्हर्च्युअल पद्धतीने होणार सुनावणी; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Last Updated : Jan 3, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.