ETV Bharat / city

Mumbai Dahi Handi Festival गिरगावात तेजस ठाकरे यांच्या पोस्टरसची चर्चा, ठाकरे म्हणजेच शिवसेना - Mumbai Dahi Handi Utsav

मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये Mumbai Dahi Handi Festival राजकीय पक्षांचा या आधीच शिरकाव झाला आहे. मात्र, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचा Dahi Handi Festival  राजकारणासाठी पुरेपूर वापर केल्याचे दिसते. गिरगावातही शिवसेनेच्या वतीने तेजस ठाकरे Tejas Thackeray यांचे पोस्टर्स लावण्यात आल्याने नवीन चर्चेला उधान आले आहे.

Shiv sena
शिवसेना
author img

By

Published : Aug 19, 2022, 10:10 PM IST

मुंबई - दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला उत्सव मुंबईत Mumbai Dahi Handi Festival मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर अथवा गल्लीबोळात दहीहंडी बांधण्यात येते ही दहीहंडी Dahi Handi Festival फोडण्यासाठी गोविंदा पथक येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला राजकीय प्रचाराचे, इव्हेंटचे स्वरूप Dahi Handi is political campaign आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी यापूर्वी या उत्सवात सहभाग घेतला होता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी दहीहंडीचा वापर राजकारणासाठी केल्याचे दिसते आहे.

शिवसेनेची दहीहंडी चर्चेचा विषय - दक्षिण मध्य मुंबईतील गिरगाव हा पारंपारिक सण आणि उत्सवासाठी ओळखला जाणारा विभाग आहे. गिरगावातील सर्व सणांची मुंबईभर Dahi Handi Festival In Giragaon छाप असते. गिरगावातील शिवसेना आयोजित केलेली दहीहंडी दरवर्षी गोविंदा पथकांच्या प्रचंड हजेरीने नावाजली जाते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी लावली. मात्र, या ठिकाणी विशेष म्हणजे पोस्टरवर तेजस ठाकरे यांचे युवाशक्ती म्हणून झळकलेले मोठे पोस्टर हा चर्चेचा विषय ठरला.

ठाकरे अधिक शिवसैनिक म्हणजे शिवसेना - यासंदर्भात विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की , ठाकरे परिवार आणि शिवसैनिक म्हणजे शिवसेना असे आम्ही मानतो. ठाकरे परिवाराला वगळून शिवसेना पूर्ण होणार नाही, आणि होत नाही. म्हणूनच ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे हे सुद्धा आता युवकांचे प्रेरणास्थान होत आहेत. म्हणूनच त्यांचेही पोस्टर आम्ही लावले आहे. राज्यात ठाकरे परिवाराला वगळण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल असा विश्वासही सकपाळ यांनी व्यक्त केला.

मनसेची ही गिरगावात दहीहंडी - गिरगावात दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही आपली दहीहंडी आयोजित केली होती या दोन्ही पक्षांच्या दहीहंडी केवळ शंभर मीटर अंतरावर असल्याने दहीहंडीच्या निमित्ताने सर्वच पक्ष आपली राजकीय ओळख आणि अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते.

हेही वाचा - LIVE गुरूजी तालीम आणि भाऊ रंगारी यांची एकत्रित दहीहंडी लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.