ETV Bharat / city

Mumbai Crime : मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने 'गुगल पे'मधून गायब केले 22 लाख रुपये - आरोपींना अटक

Mumbai Crime : गेम खेळण्यासाठी मोबाइल मागून दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून 22 लाख रुपयांची चोरी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Jul 21, 2022, 9:05 AM IST

मुंबई - मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने एका ज्येष्ठ नागरिकाला 22 लाखांना लुबाडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Mumbai Police ) आरोपींनी 'गुगल पे' चा वापर करत या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून 22 लाख रुपये लंपास केले आहे. ( Mumbai Crime ) बेस्टच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime

गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईल मागितला - मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व येथे राहणारे प्रकाश नाईक हे ( वय- 68 ) बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना बेस्टकडून २२ लाख रुपये मिळाले. ( Maharashtra News ) सेवानिवृत्तीनंतर ते दिंडोशी बस डेपोजवळ रोज फिरायला जात. दोन अनोळखी मुले भेटली. दोन्ही मुलांची नाईकशी जवळीक निर्माण झाली.आणि त्यांनी नाईककडून गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईल मागितला आणि गुगल पे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून नाईकच्या खात्यातून दोन महिन्यात २२ लाख रुपये काढले.

22 लाख रुपये लंपास - मुंबईत गोरेगाव पूर्वमध्ये राहणारे प्रकाश नाईक ( वय - 68 ) हे काही महिन्यांपूर्वी बेस्टमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्या बँक खात्यात त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला, देणी म्हणून जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले होते. ( Maharashtra News ) निवृत्तीनंतर प्रकाश नाईक गोरेगावमधील दिंडोशी बस आगारात दररोज फिरण्यासाठी जात होते. या ठिकाणी त्यांची ओळख अनोळखी मुलांसोबत झाली होती. ओळख झाल्यावर या दोन्ही मुलांनी प्रकाश नाईक यांचा विश्वास संपादन केला.

फसवणूक झाल्याची तक्रार - यानंतर गेम खेळण्यासाठी हे दोघेजण त्यांचा मोबाइल वापरत होते. या दोघांनी मोबाइलमध्ये गुगल पे हे मोबाइल अॅप डाउनलोड करत, त्यांच्या खात्यातून 2 महिन्यात तब्बल 22 लाख रुपये लंपास केले आहे. ही चोरी इतकी बेमालूमपणे झाली, की प्रकाश नाईक यांना याची काही माहिती देखील झाली नाही. प्रकाश नाईक एक दिवस बँकेमध्ये आपल्या बँक खात्याबद्दल माहिती घ्यायला गेले होते. त्यावेळी बँकेने माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. या प्रकाराविषयी त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे.

शुभम तिवारी (वय- 22) आणि अमर गुप्ता (वय-28) असे आरोपींचे नाव असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोपी प्रकाश नाईक यांच्याकडून मोबाइलमध्ये गेम खेळण्याचा नावाने मोबाइल घेत असत. त्यामध्ये गुगल पेच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेत असतं. व्यवहार झाला असल्याचा आलेला मेसेज डिलीट केला जात असतं. मोबाइलमधील सर्व पुराव्यांची स्वच्छता केल्यानंतर त्यांना पुन्हा मोबाइल द्यायचे, आरोपींनी अशा प्रकारची फसवणूक इतरांसोबत केली आहे काय ? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. आरोपींची चौकशी सुरू असून अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहे.

हेही वाचा - Letter of Raj Thackeray : मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.