ETV Bharat / city

मुंबई: 1 कोटी 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त; गुन्हे शाखेकडून चार जणांना अटक

author img

By

Published : Dec 11, 2020, 6:23 PM IST

आरोपी कांदिवली पश्चिम येथील खजुरिया नगर येथे येणार असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक 11 ला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आयव्हरी कोस्टा या देशाचा 31 वर्षीय परदेशी नागरिक आहे. तर दुसरा आरोपी 29 वर्षांचा आहे.

अमली पदार्थ
अमली पदार्थ

मुंबई- अमली पदार्थ तस्करी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथक 11 ने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने कांदिवली पश्चिम येथील खजुरिया नगर येथून तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांसह चार आरोपींना अटक केली आहे.

आरोपी कांदिवली पश्चिम येथील खजुरिया नगर येथे येणार असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक 11 ला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आयव्हरी कोस्टा या देशाचा 31 वर्षीय परदेशी नागरिक आहे. तर दुसरा आरोपी 29 वर्षांचा आहे. हे दोन्ही परदेशी नागरिक नालासोपारा येथील राहतात. अटक करण्यात आलेले इतर दोन आरोपी हे मुंबईतील सायन कोळीवाडा येथील राहणारे आहेत.

हेही वाचा-पुणे : 20 कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचे गुजरात कनेक्शन; वडोदरासह मुंबईमधून सहा जणांना अटक

700 ग्राम एमडी जप्त-

10 डिसेंबरला झालेल्या कारवाई दरम्यान आरोपींमध्ये दोन परदेशी नागरिक व दोन भारतीय नागरिक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींच्या ताब्यातून एकूण 700 ग्राम एमडी पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-उल्हासनगरात नशेबाजीचा व्यापार करणारी लेडी डॉन जेरबंद; 1 किलो ६० ग्राम गांजा जप्त

सराईत गुन्हेगार अमली पदार्थ तस्करीत सहभागी-
अटक करण्यात आलेल्या 34 वर्षाच्या आरोपीवर मुंबईतील वडाळा पोलीस ठाणे , माटुंगा पोलिस ठाणेच्या अंतर्गत चोरी, शारीरिक दुखापत, खुनाचा प्रयत्नसारखे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूप्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.