मुंबई - खंडणी प्रकरणी चौकशी करणारी मुंबई गुन्हे शाखेने परमबीर सिंह यांना या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांसह पोलिसांसमोर सादर करण्याची आणखी एक संधी देईल. तसेच गुन्हे शाखेच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत या प्रकरणात १२ साक्षीदारांचे बयान (व्हिडिओग्राफी) नोंदवले गेले आहेत. त्याचप्रमाणे सुत्रांनी असेही उघड केले की, सर्व साक्षीदारांनी त्यांच्या विधानांमध्ये उघड केले आहे की, सचिन वाझे परमबीर सिंगला "नंबर वन" म्हणून संबोधित करत होते.
मुंबई कांदिवली क्राइम ब्रँच युनिट ११ ने परमबीर सिंग यांना नोटीस पाठवून संबंधित कागदपत्रांसह पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील. तसेच, परमबीर सिंग यांना आणखी एक समन्स जारी करणार असल्याची माहिती आहे.
शोधून शोधून दमले, पण परमबीर सिंग सापडेना - जयंत पाटील
परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्यावरील गुन्हे वेगवेगळे आहेत. परमबीर सिंग शोधुनही सापडत नाही. देशमुखांच्या बाबतीतही तसं दिसतंय. मात्र, देशमुखांना मुद्दाम अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. बाऊ करुन देशमुखांच्या मागे ईडी लावण्यात आली. दुसरीकडे परमबीर सिंगांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पण ते नोटीस घोण्यासाठी उपलब्ध होत नाही अशी स्थिती झाल्याचे पाटील शिर्डीत बोलताना म्हणाले.