मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत (Mumbai Cricket Association Election Caused BJP Retreat) भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर पक्षाच्या आदेशानंतर माघार घेतली आहे. राज ठाकरे यांनी भाजपला लिहिलेले पत्र आणि शरद पवार यांनी उमेदवारी माघारी घेण्याबाबत केलेले आवाहन याचा हा एकत्रीत परिणाम आहे की? अन्य काही आहे? याबाबत विचार करायला हवा असे मत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे.
माघारीला वेगळे संदर्भ : भाजपच्या माघारी मागे काही राजकीय वास येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांचे संयुक्त पॅनल उभे आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रचंड पैशाची आहे. त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणातून अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही हालचाली झाल्या का? याबाबत तपासले गेले पाहिजे या निवडणुकीची काही शक्यता यामागे आहे का? असा संशय नाना पटोले यांनी मुंबईत व्यक्त केला.
शरद पवार शेलार यांच्या पाठीशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आधी संदीप पाटील यांच्या पाठीशी होते. मात्र अचानक त्यांनी आशिष शेलार यांना आपले समर्थन दिले, त्यामुळे याच एमसीएच्या निवडणुकीचा अंधेरी पूर्व पोट निवडणुकीवर राजकीय प्रभाव पडला का? अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.Mumbai Cricket Association Election