ETV Bharat / city

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; प्रभाकर साईलविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली - Mumbai court refuses relief to NCB

आर्यन खान प्रकरणात पंच प्रभाकर साईलने व्हिडिओ प्रसिद्ध करून खंडणीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनसीबीने त्याचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून मुंबई सत्र न्यायलयात धाव घेतली.

NCB Sameer Wanakede
समीर वानखेडे
author img

By

Published : Oct 25, 2021, 6:59 PM IST

मुंबई - आर्यन खान अटक प्रकरणात रोज नवीन खुलासे बाहेर येत आहेत. पंच प्रभाकर साईलने व्हिडिओ प्रसिद्ध करून खंडणीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनसीबीने त्याचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. पण, न्यायालयाने ही याचिका येथे दाखल करू नका, असे म्हणत समीर वानखेडे यांची याचिका फेटाळली आहे.

हेही वाचा - VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्ठ जयंत यांच्याशी खास मुलाखात.

प्रभाकर साईलविरोधातील याचिका फेटाळली -

पंच प्रभाकर साईल याने रविवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून किरण गोसावीवर 25 कोटी खंडणीचा आरोप केला होता. या 25 कोटीची डील ही 18 कोटींवर फायनल झाली होती. यातील 8 कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा साईलने केला आहे. या आरोपानंतर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध करून जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, असे उत्तर दिले होते.

NCB ने दाखल केली होती याचिका -

प्रभाकर साईल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला दावा ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीने एनडीपीएस न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्यावर वैयक्तिगत आणि कुटुंबावर नको ते आरोप होत आहेत, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला होता. परंतु, एनसीबीची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एनसीबीने योग्य न्यायालयात दाद मागावी, असे सांगत याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.