ETV Bharat / city

मुंबईला हायपरटेन्शन मुक्त करण्यासाठी पालिकेचा अँक्शन प्लॅन - हायपरटेन्शन मराठी बातमी

मुंबईने कोरोना विषाणूवर विजय मिळवला आहे. मात्र त्याच वेळी ३४ टक्के मुंबईकर नागरिकांना हायपरटेन्शन आजार झाल्याचे समोर आले आहे. इतर जीवघेण्या आजारांना हायपरटेन्शन जबाबदार असल्याने नागरिकांना या आजरापासून मुक्त करण्यासाठी पालिकेने अँक्शन प्लॅन तयार केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी mumbai corporation action plan to make Mumbai free of hypertension दिली.

hypertension
hypertension
author img

By

Published : Aug 20, 2022, 8:01 PM IST

मुंबई - मुंबईने कोरोना विषाणूवर विजय मिळवला आहे. मात्र त्याच वेळी ३४ टक्के मुंबईकर नागरिकांना हायपरटेन्शन आजार झाल्याचे समोर आले आहे. इतर जीवघेण्या आजारांना हायपरटेन्शन जबाबदार असल्याने नागरिकांना या आजरापासून मुक्त करण्यासाठी पालिकेने अँक्शन प्लॅन तयार केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी mumbai corporation action plan to make Mumbai free of hypertension दिली.

३४ टक्के मुंबईकरांमध्ये ‘हायपरटेन्शन’ - मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान विषाणूच्या चार लाटा येवून गेल्या. या चारही लाटांवर मुंबईकरांनी विजय मिळवला आहे. मात्र याच दरम्यान मुंबई महापालिकेने मुंबईत पाच हजार व्यक्तींचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये, ३४ टक्के मुंबईकरांमध्ये ‘हायपरटेन्शन’ आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणात ८० ते ८८ टक्के लोक हायपरटेन्शन वरचे उपचार घेत नसल्याचे म्हटले आहे. हार्टएटॅक, किडनी, ब्रेन स्ट्रोक यासारख्या मोठ्या आजारांना 'हायपरटेन्शन' हे कारणीभूत आहे. यासाठी पालिकेने 'हायपरटेन्शन' मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेचा अँक्शन प्लॅन - हायपरटेन्शनला नियंत्रणात आणण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आशा वर्कर, सीएचव्ही यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी 'विशेष मोहीम' हाती घेणार आहे. प्रत्येक रुग्णालयात हायपर टेन्शन कॉर्नर सुरू करणार आहे. प्रथम झोपडपट्टीत नंतर मध्यमवर्गीय वसाहतीत व त्यानंतर श्रीमंत वसाहतीत सर्वेक्षण करून शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. हायपर टेन्शनग्रस्त आढळून येतील त्यांचे ब्लड प्रेशर तपासून त्यांना तत्काळ मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, पुढील सात - आठ महिन्यात याच मोहिमेत कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, मधुमेह यासह इतर आजारांचाही समावेश केला जाणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले. या मोहिमेत चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर, सीएचव्ही यांचे मानधन वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हायपरटेन्शनची कारणे - धावत्या मुंबईत मुंबईकरांचे जनजीवन हे सततच्या धावपळीचे झाले आहे. मुंबईकरांची लाइफस्टाइलही वेगळी आहे. घरचे कमी आणि बाहेरचे, रस्त्यावरचे खाणे जास्त असते. नाश्ता, जेवण आदी अवेळी खाणे, आवश्यक विश्रांती वेळेत न घेणे, कामाचा प्रचंड ताण आदी कारणांमुळे मुंबईत अनेकांना 'हायपरटेन्शन' च्या आजाराने ग्रासले आहे. मुंबईत 'कोरोना' ग्रस्त अनेक रुग्णांच्या मृत्यूला 'हायपर टेन्शन' हे सुद्धा कारण असल्याचे त्यावेळी समोर आले होते.

हेही वाचा - Ashish Shelar मुंबई पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज रहा, आशिष शेलारांनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.