ETV Bharat / city

वांद्रे येथे जमलेल्या जमाव प्रकरणाची चौकशी होणार : मुंबई पोलीस उपायुक्त

मुंबईतील वांद्रे बस डेपो परिसरामध्ये हजारोच्या संख्येने आज (मंगळवार) जमाव जमला होता. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, असे म्हणत हा जमाव रस्त्यावर ठाण मांडून बसला होता. पोलिसांनी समजावून देखील या जमावातील काही जण आक्रमक झाल्याने जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता.

मुंबई पोलीस उपायुक्त
मुंबई डीसीपी प्रणय ओक
author img

By

Published : Apr 14, 2020, 8:29 PM IST

मुंबई - वांद्रे बस डेपो परिसरामध्ये हजारोच्या संख्येने आज (मंगळवार) जमाव जमला होता. लॉकडाऊन असतानाही अचानक हा जमाव वांद्रे बस डेपो या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा आला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल आणि तातडीने चौकशी करणार, असे मुंबईचे पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी म्हटले आहे.

वांद्रा येथील जमाव प्रकरणाची चौकशी होणार.. मुंबई पोलीस उपायुक्त

हेही वाचा... लॉकडाऊन : वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या जमावावर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरामध्ये संचारबंदी आणि लॉडाऊनचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही मुंबईतील वांद्रे बस डेपो परिसरामध्ये हजारोच्या संख्येने आज (मंगळवार) जमाव जमला होता. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, असे म्हणत हा जमाव रस्त्यावर ठाण मांडून बसला होता. पोलिसांनी समजावून देखील या जमावातील काही जण आक्रमक झाल्याने जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यातून रस्त्यावर जमलेल्या नागरिकांना पांगवण्यात आल्याचे मुंबई पोलीस विभागाचे प्रवक्ते उपायुक्त अशोक प्रणय यांनी म्हटले आहे. दरम्यान वांद्रे परिसरात असलेल्या गारमेंट कंपनीत काम करणारे मजूर, वांद्रे परिसरातील लिंकिंग रोडवर काम करणारे मजूर, हे सर्व परराज्यातील लोक जमावात होते असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. अचानक हा जमाव वांद्रे बस डेपो या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा आला. याचाही शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे, असे उपायुक्त अशोक प्रणय यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... आम्हाला गावी जावू द्या ! 'लॉकडाऊन' वाढल्याने मुंबईतील परप्रांतीय मजूर संतापले, हजारोंचा वांद्रे स्थानकाबाहेर ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.