मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 6361 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 1 लाख 7 हजार 725 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 22 लसीकरण केंद्रांवर 104 बूथवर 4700 आरोग्य कर्मचारी तर 5700 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2382 आरोग्य कर्मचारी तर 3979 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6361 जणांना लस देण्यात आली. आज 5 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 7 हजार 725 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कस्तुरबा हॉस्पिटल 683, नायर 13804, जेजे हॉस्पिटल 830, केईएम 13234, सायन हॉस्पिटल 6282, व्ही एन देसाई 1592, बिकेसी जंबो 10694, बांद्रा भाभा 5021, सेव्हन हिल हॉस्पिटल 6604, कूपर हॉस्पिटल 8831, गोरेगाव नेस्को 3931, एस के पाटील 1196, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 780, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 12676, दहिसर जंबो 1127, भगवती हॉस्पिटल 878, कुर्ला भाभा 250, सॅनिटरी गोवंडी 1369, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 922, राजावाडी हॉस्पिटल 13576, वीर सावरकर 1148, मुलुंड जंबो 1380 अशा एकूण 1 लाख 7 हजार 725 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.