मुंबई - आज राज्यात ४ हजार १५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८४ हजार ३६१ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के आहे. राज्यात आज एकूण ८१ हजार ९०२ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
८१ हजार ९०२ अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात आज ३ हजार ७२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला असून आजपर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७४ टक्के झाले आहे. आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,८१,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने म्हणजेच १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख १७ हजार ७११ व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये तर ६ हजार ५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८१ हजार ९०२ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळले ?
राज्यात जून महिन्यात दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८,५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५,९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३,६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९ तर १० नोव्हेंबरला ३,७९१ रुग्ण आढळले. यानंतर १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५,७६० रुग्ण आढळून आले आहेत.