ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत 840 कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

मुंबई आज ( 25 जून ) 840 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 668 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु ( Mumbai Corona Update ) आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Jun 25, 2022, 8:19 PM IST

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले पाच दिवस २ हजारांवर रुग्ण आढळून येत होते. कोरोना रुग्णांची नोंद होणाऱ्या आयसीएमआर पोर्टल सुरू नसल्याने आज ( 25 जून ) केवळ ८४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१०.८६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार ७३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८४० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.८६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. २०५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७२ हजार ९६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ०४३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४०० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१६७ टक्के इतका आहे.

२३ रुग्ण व्हेंटिलेटरवर - मुंबईत आज ( 25 जून ) आढळून आलेल्या ८४० रुग्णांपैकी ७४८ म्हणजेच ८९ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७६८ बेड्स असून, त्यापैकी ६६८ बेडवर रुग्ण आहेत. ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. यादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८, २५ जूनला ८४० रुग्णांची नोंद झाली आहे.

१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईच १ हजार ८,९८ नव्या रुग्णांची नोंद, २ मृत्यू, १८ व्हेंटिलेटरवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.