ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड मोडला, २४ तासात १५,१६६ नव्या रुग्णांची नोंद - Maharashtra Public Health Department

मुंबईत ( Mumbai Corona Update ) आज (५ जानेवारीला) १५,१६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ३३ हजार ६२८ रुग्णांची ( Corona Patients In Maharashtra ) नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड आज मुंबईने मोडला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे ( Maharashtra Public Health Department ) टेंशन वाढले आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Jan 5, 2022, 8:11 PM IST

Updated : Jan 6, 2022, 1:22 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० रुग्ण आढळून आले होते. मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल १०,८६० रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन १५,१६६ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड आज मुंबईने मोडला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

१५,१६६ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (५ जानेवारीला) १५,१६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ३३ हजार ६२८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६१ हजार ९२३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवस इतका आहे. मुंबईमधील ४६२ इमारती आणि २० झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. २९ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.७८ टक्के इतका आहे.

८३.६ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या १५,१६६ रुग्णांपैकी १३१९५ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १२१८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ८० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३०,४८७ बेड्स असून त्यापैकी ५१०४ बेडवर म्हणजेच १४.४ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८३.६ टक्के बेड रिक्त आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 2020 च्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत ८१ नवे रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हुन अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात धारावीत ८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती.

Last Updated : Jan 6, 2022, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.