ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत १३ हजार ७०२ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज ( दि. १३ जानेवारी ) १३ हजार ७०२ नव्या रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) झाली असून सहा जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू ( Death by Corona ) झाला आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या ९५ हजार १२३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Mumbai ) आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 13, 2022, 8:07 PM IST

Updated : Jan 13, 2022, 8:25 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज ( दि. १३ जानेवारी ) १३ हजार ७०२ नव्या रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) झाली असून सहा जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू ( Death by Corona ) झाला आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या ९५ हजार १२३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Mumbai ) आहेत.

२० हजार ८४९ रुग्णांना डिस्चार्ज - मुंबईत आज (१३ जानेवारीला) १३ हजार ७०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २० हजार ८४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ( Recover From Corona ) आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ६९ हजार ९८९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ५५ हजार ८११ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ९५ हजार १२३ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ६१ इमारती सील आहेत. ६ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८५ टक्के इतका आहे.

८२.७ टक्के बेड रिक्त - मुंबईत आज आढळून आलेल्या १३ हजार ७०२ रुग्णांपैकी ११ हजार ५१० म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ८७१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १२७ रुग्णांना ऑक्सिजन बेडची ( Oxygen Beds in Mumbai ) आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६ हजार ९७९ बेडस असून त्यापैकी ६ हजार ४१० बेडवर म्हणजेच १७.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८२.७ टक्के बेड रिक्त ( Available Beds in Mumbai ) आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या - मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९ हजार ४७४, १० जानेवारीला १३ हजार ६४८, ११ जानेवारीला ११ हजार ६४७, १२ जानेवारीला १६ हजार ४२०, १३ जानेवारीला १३ हजार ७०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत ४९ रुग्ण - मुंबईतील धारावी ( Corona in Dharavi ) ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३, १० जानेवारीला ९७, ११ जानेवारीला ५१, १२ जानेवारीला ६९, १३ जानेवारीला ४९ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८ हजार ३१२ रुग्ण असून त्यापैकी ७ हजार २०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ६८६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Dharavi ) आहेत.

मुंबई पोलिसांनाही कोरोना - कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने शासनाने राज्यात निर्बंध, जमावबंदी व संचारबंदी सारखे नियम लागू केले आहे. या नियमांची अंमलबजावणी व्हावी व नागरिकांकडून नियामांचे पालन व्हावे यासाठी पोलीस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, यामुळे पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. मागील ४८ तासांत मुंबईतील २३९ पोलिसांना कोरोनाची लागण ( Mumbai Police Corona Update ) झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Patients : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मात्र ८१ टक्के बेड्स रिकामे

Last Updated : Jan 13, 2022, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.