मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी (27 डिसेंबर) 809 नव्या रुग्णांची नोंद झाली ( 809 New Patients Find Out ) आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
4 हजार 765 सक्रिय रुग्ण -
आज 27 डिसेंबरला 809 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 मृत्यूची नोंद झाली आहे. आज 335 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 71 हजार 921 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 48 हजार 199 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 765 सक्रिय रुग्ण (Active Corona Patients in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( Corona Patient Recovery Rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 967 दिवस इतका आहे. मुंबईमधील 29 इमारती आणि एक झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.07 टक्के इतका आहे.
या दिवशी रुग्णसंख्या वाढली
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
सात वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा 22 डिसेंबरला सहाव्यांदा तर 25 डिसेंबरला सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत ( Corona Patient Deaths in Mumbai ) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा - Anger of Matang community : मातंग समाजाचा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश