मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात वाढ होऊन १०० च्या वर रुग्णसंख्या आढळून येत आहे. आज बुधवारी १२४ नव्या रुग्णांची नोंद ( 124 new patients ) झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८५१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
१२४ नवे रुग्ण : मुंबईत आज बुधवारी १२४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ११७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६१ हजार ०३८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार ६२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८४४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६१६१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १२४ रुग्णांपैकी १२२ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार २४९ बेड्स असून त्यापैकी २३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४, १ मे ला ९२, २ मे ला ५६, ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७, ७ मे ला १७२, ८ मे ला १२३, ९ मे ला ६३, १० मे ला १२२, ११ मे ला १२४ रुग्णांची नोंद झाली आहे.
८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ११ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - भारत बायोटेक कोरोना संपविणारी विकसित करणार लस , कंपनीला मिळाला 149 कोटी रुपयांचा निधी