ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईच १ हजार ८,९८ नव्या रुग्णांची नोंद, २ मृत्यू, १८ व्हेंटिलेटरवर

मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा ( Corona Virus Increase) वाढ होऊ लागली आहे. गेले पाच दिवस २ हजारावर रुग्ण ( Active Corona Patients ) आढळून आले. गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १ हजार ८९८ नव्या रुग्णांची ( Corona New Patients) नोंद झाली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:23 PM IST

मुंबई - मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले पाच दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १ हजार ८९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६,६५ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७७ रुग्ण ऑक्सिजनवर असून १५८ रुग्ण आयसीयूमध्ये आहे. तसेच १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१२.७० टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार ९४४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार ८९८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १२.७० टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर, आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३ हजार ७६० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७० हजार ९१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार २५७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ३८६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७३ टक्के इतका आहे.

१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर - मुंबईत आज आढळून आलेल्या १ हजार ८९८ रुग्णांपैकी १ हजार ८०२ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७७२ बेड्स असून त्यापैकी ६,६५ बेडवर रुग्ण आहेत. ७७ रुग्ण ऑक्सिजनवर, १५८ रुग्ण आयसीयूमध्ये तर, १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

हेही वाचा - Aaditya Thackeray on Eknath Shinde : 'राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फसवले असते वाईट वाटले नसते, पण प्रियजनांनी फसवले'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.