मुंबई - मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ( Mumbai Corona ) वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी 602 नवे रुग्ण आढळले तर शहर आणि उपनगरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 813 वर जाऊन पोहचली. त्यातच आता राज्यासह मुंबईत वाढणाऱ्या ओमायक्रॉनच्या ( Maharashtra Omicron Cases ) रुग्णसंख्येने पुन्हा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण
महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचे ( Maharashtra Omicron Cases ) 23 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकुण रुग्णांची संख्या 88 वर गेली. त्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही, पुणे) 22 तर राष्ट्रीय रसायन संस्थेने 1 रुग्णाचे निदान केले आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 13 रुग्ण आढळले आहे. मुंबई 5, उस्मानाबाद 2, ठाणे मनपा, नागपूर आणि मीरा भाईंदर मनपा परिसरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत 42 ओमायक्रॉन ( Omicron ) रुग्णांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे.
मुंबईत ओमायक्रॉनची भीती -
पहिली लाटेनंतर दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट ( Corona Delta Varient ) ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी होताच राज्य सरकारने निर्बंध शिथील केले होते. त्यानंंतर आता जगभरात ओमायक्रॉनचे ( World Omicron ) रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतही ओमायक्रॉनचे ( Mumbai Omicron ) 35 रुग्ण आतापर्यंत आढळून आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
"विषाणूत बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे."
रुग्णसंख्येत वाढ -
दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात मुंबईत कोरोनाने (Mumbai Corona ) उच्चांक गाठत 11 हजार रुग्णांची नोंद केली होती. तदनंतर जूनपासून त्यात घट होऊन 1 डिसेंबरला सर्वाधिक कमी कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळले. मात्र, 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 18 डिसेंबरला 283 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, सुख:द बाब ही आहे की, दुसऱ्या लाटेनंतर १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झाली आहे. त्यानंतर ११, १५ व १८ डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे ( Corona ) होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - Fresh Guidelines : सावधान! सरकार आज जारी करणार नवी नियमावली