ETV Bharat / city

मुंबई काँग्रेसमध्ये दोन महिन्यात फेरबदल! एकनाथ गायकवाडांची उचलबांगडी होणार? - MPCC news

देशाच्या आर्थिक राजधानीत एकेकाळी काँग्रेसची मक्तेदारी असतानाही अंतर्गत वादामुळे काँग्रेसने आपले अस्तित्वच गमावले असल्याने त्याची दखल पक्षाकडून घेण्यात आली आहे. तसेच राज्यातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीला आवर घालण्यासाठी राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल केले जाणार आहेत.

Mumbai Congress
मुंबई काँग्रेस
author img

By

Published : Oct 20, 2020, 6:30 AM IST

मुंबई- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली असतानाच आता काँग्रेसने सुद्धा पक्षातच फेरबदल करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषत: येत्या दोन महिन्याच्या आतच मुंबईतील प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या एकनाथ गायकवाड यांची उचलबांगडी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे काँग्रेसने मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु त्यांच्या कामावर पक्षाने नाराजी व्यक्त केली असल्याने त्यांना हटवून तरुण चेहऱ्याला मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाच्या आर्थिक राजधानीत एकेकाळी काँग्रेसची मक्तेदारी असतानाही अंतर्गत वादामुळे काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले असल्याने त्याची दखल पक्षाकडून घेण्यात आली आहे. तसेच राज्यातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीला आवर घालण्यासाठी राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल केले जाणार आहेत. राज्याचे नूतन काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दोन महिन्यांमध्ये मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नव्या व्यक्तीची नेमणूक केली जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची निवडणूक दीड वर्षावर आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसकडून नवा चेहरा देण्याच्या हालचाली पक्षात सुरू असल्याचे सांगण्यात येते.

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर मुंबईत काँग्रेसला विविध आंदोलनांच्या माध्यमातून बिहारी बाबू व शिवसेनेतून आलेले संजय निरुपम यांनी जिवंत ठेवले होते. परंतु त्यांची लोकसभा निवडणुकीदरम्यान हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची वर्णी लागली. मात्र देवरा यांना लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे हटवण्यात आले. त्यानंतर मुंबईत सामूहिक निर्णय घेण्याचे पक्षश्रेष्ठींनी सांगितले. ते शक्य झाले नाही. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दलित चेहरा असलेले धारावीतील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची नेमणूक झाली. गायकवाड यांचे वय 80 आहे. गायकवाड यांच्या कन्या वर्षा या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आहेत.

मात्र मुंबईतील पक्षाच्या संघटनेविषयी पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. मुंबईमध्ये अमराठी किंवा दलित असा अध्यक्ष निवडण्याचा काँग्रेसचा नेहमी कल राहिला आहे. मुंबईत काँग्रेसमध्ये सध्या विशेष घडामोडी घडत नाहीत. मुंबईत पक्ष म्हणून काँग्रेस अत्यंत कमकुवत राहीला असल्यानेच येत्या दोन महिन्यांमध्ये मुंबई काँग्रेसमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.