ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने थोपटले दंड, २२७ जागांवर देणार उमेदवार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज झाली असून, सामान्य मुंबईकरांचे प्रश्न घेऊन काँग्रेस सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांवर उमेदवार उभे करून महानगरपालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दंड थोपटले आहेत.

Mumbai Congress ready for municipal elections

author img

By

Published : Mar 12, 2021, 8:18 PM IST

Updated : Mar 12, 2021, 8:29 PM IST

मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज झाली असून, सामान्य मुंबईकरांचे प्रश्न घेऊन काँग्रेस सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांवर उमेदवार उभे करून महानगरपालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दंड थोपटले आहेत.

2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर ठेवून मुंबई काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांवर उमेदवार उभे करून महानगरपालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दंड थोपटले आहेत. मुंबईकरांच्या समस्यांना हात घालून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसने आता कंबर कसतेय. जेणेकरून या समस्यांवर आक्रमक होऊन मुंबईकरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मुंबई काँग्रेसकडून केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना भाई जगताप

हे ही वाचा - विद्यार्थ्यांचे प्रकरण हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग अपयशी -अजित पवार
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत, गेल्या अनेक वर्षापासून खितपत पडलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्याला हात घातला. देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता केव्हाच संपली असून मुंबईकरांसाठी तळोजा येथे नवीन डम्पिंग ग्राउंड बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यासोबतच महानगरपालिकेकडून मलनि:सारणावर योग्य प्रक्रिया न करताच मलनि:सारनाचे पाणी समुद्रात सोडले जात आसल्याचा आरोप केलाय. या कारणामुळे हरित लवादाने महानगरपालिकेला जवळपास ३० कोटींचा दंडही केला असल्याचं भाई जगताप म्हणाले.

मुंबईमध्ये पूर्व तसेच पश्चिम उपनगरातून द्रुतगतिमार्गाने नोकरी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे. अशा वेळेस मोठ्या प्रमाणात अपघाताचा आकडा देखील वाढत असल्याने पूर्व उपनगर द्रुतगती मार्गावर देखील एक ट्रॉमा केअर सेंटर करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली आहे. याआधी पश्चिम उपनगर द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी परिसरात ट्रॉमा केअर सेंटर असल्याने अपघात झाल्यानंतर नागरिकांवर उपचार करण्याची सोय तेथे उपलब्ध होते. मात्र पूर्व उपनगरांमध्ये अशा प्रकारची सोय नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. तर तिथेच मागच्या सरकारने प्रभाग रचना बदलण्याचा कालावधी पाच वर्षाचा केल्याने नगरसेवक आपल्या प्रभागात लक्ष देत नाहीत. त्यामुळे या प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच दहा वर्षाकरिता ठेवण्यात याव्यात अशीदेखील मागणी भाई जगताप यांनी केली आहे
हे ही वाचा - भाजप नेते डिस्टर्ब.. सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी - नाना पटोले

कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचारावर राजकारण करण्याची ही वेळ नाही -

कोविड सेंटर उभारताना मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. अव्वाच्या सव्वा किंमत लावत अनेक वस्तू खरेदी करण्यात आल्या. तसेच निविदा न काढता कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. हे कॉन्ट्रॅक्ट नेत्यांनी आपल्याच जवळच्या लोकांना मिळवून दिले. अशा प्रकारचे गंभीर आरोप भाजपने शिवसेनेवर केले आहेत. मात्र सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट तयार होण्याची शक्यता आहे. यासोबतच गेल्या वर्षी कोरोनाचे रुग्ण मुंबई तसेच राज्यात सापडू लागल्यानंतर आरोग्य व्यवस्था उभी करण्याचे आव्हान राज्य सरकार तसेच महापालिकेवर होतं. अशा परिस्थितीत काम करत असताना जर काही गैरव्यवहार झाला असेल, त्याची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. मात्र सध्या आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. मात्र या मुद्याचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. असं स्पष्ट मत भाई जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं

Last Updated : Mar 12, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.