ETV Bharat / city

Mumbai Congress agitation : वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन - Mumbai Congress agitation

कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने 31 मार्च पासून आंदोलनाचा सप्ताह सुरू केला आहे. त्यानुसार आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) नेतृत्वाखाली, वाढत्या महागाईच्या विरोधात दादर पूर्व येथील विभागात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Mumbai Congress
Mumbai Congress
author img

By

Published : Apr 6, 2022, 5:42 PM IST

मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईमध्ये मुंबई कॉंग्रेस तर्फे आंदोलन ( Mumbai Congress agitation against inflation ) करण्यात आले. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दादर पूर्व येथील विभागात हे आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनामध्ये मंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Sheikh ), त्याचबरोबर काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन

महागाईवर मोदी सरकारची चुप्पी- केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने 31 मार्च पासून आंदोलनाचा सप्ताह सुरू केला आहे. यासाठी आज मुंबईमध्ये मुंबई कॉंग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणामध्ये महागाईविरोधात विशेष करून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या प्रसंगी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले ( Bhai Jagtap on rising inflation ) की, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंचे दर हे आता सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य लोकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

या पूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलनं करण्यात आली. परंतु मोदी सरकार या महागाईच्या प्रश्नावर ब्र शब्द काढायला तयार नाही. जेव्हा पाच राज्यांच्या निवडणुका होत्या, तेव्हा महागाई आणि इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. परंतु निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याचे, भाई जगताप म्हणाले. केंद्रातील भाजपा सरकार दररोज इंधन वाढ करत आहे. यासाठी उद्या सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असेही भाई जगताप म्हणाले.

हेही वाचा - Accident CCTV Video : पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; चार पलट्या खाऊनही सर्व जण बचावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.