मुंबई गणेशोत्सवाच्या अखेरीस अनंत चतुर्दशी दिनी Ganesh Visarjan मोठ्या संख्येने होणारे गणेश मूर्ती विसर्जन लक्षात घेऊन पालिकेने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चौपाट्यांवर विसर्जनस्थळी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आहे. Ashwini Bhide for Ganesh visarjan reviewed गिरगांव चौपाटीसह वरळी, दादर, माहीम, शीव आदी ठिकाणी भेटी देवून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली व प्रशासनाला योग्य ते निर्देश Appropriate instructions to administration दिले आहे.
विसर्जन स्थळांचा आढावा कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्षानंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. दीड दिवस, पाच दिवस व सहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने Brihanmumbai Municipal Corporation नैसर्गिक स्थळांवर चोख व्यवस्था ठेवली आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलाव Artificial lake देखील तयार केले आहेत. गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विशेषतः अनंत चतुर्दशी दिनी मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन भिडे यांनी विसर्जन स्थळांना भेटी देवून पाहणी करून आढावा घेतला आहे. यावेळी उपआयुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त चंदा जाधव, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, गजानन बेल्लाळे उपस्थित होते.
थेट तराफ्यावर जावून पाहणी गिरगांव चौपाटी शहर विभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत आहेत. अनंत चतुर्दशी दिनी विविध मान्यवर, पाहुणे, राजदूत, निमंत्रित, विदेशी नागरिक देखील याठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येतात. त्याअनुषंगाने स्वागत व्यवस्था, विसर्जन मार्ग व विसर्जनासाठी समुद्र किनारी केलेली व्यवस्था, पाहुण्यांसाठी उभारलेला शामियाना, निरनिराळे कक्ष, वाहनतळ नियोजन, स्वच्छता राखण्यासाठी केलेली उपाययोजना तसेच सुरक्षा व्यवस्था यांची संपूर्ण माहिती भिडे यांनी जाणून घेतले आहे. एफ उत्तर विभागातील शीव (सायन) तलाव या नैसर्गिक स्थळी देखील अतिरिक्त आयुक्तांनी थेट तराफ्यावर जावून पाहणी केली आणि तलावात मूर्ती विसर्जन नेमके कसे केले जाते, याचा तपशिल जाणून घेतला आहे.