ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचा उद्रेक; गुरुवारी 5504 नवीन रुग्ण, 14 जणांचा मृत्यू - corona patients in mumbai

गुरुवारी मुंबईत 5504 रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

mumbai corona
मुंबई कोरोना
author img

By

Published : Mar 25, 2021, 7:58 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी वर्षभरातील सर्वाधिक 5 हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज मुंबईत 5504 रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

सर्वाधिक रुग्णांची नोंद -

मुंबईत 24 मार्चला 5185 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 5504 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 80 हजार 115 वर पोहचला आहे. आज मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 620 वर पोहचला आहे. 2281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 33 हजार 693 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 33 हजार 961 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 75 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 40 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 475 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 38 लाख 41 हजार 369 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - 'देशातील मुस्लिम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील'; तृणमूल नेत्याचे वादग्रस्त विधान

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 6 जानेवारीला 795, त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 रुग्ण आढळून आले होते त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508, 12 मार्चला 1646, 13 मार्चला 1708, 14 मार्चला 1962, 15 मार्चला 1712, 16 मार्च 1922, 17 मार्चला 2377, 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - वाझेची संपत्ती जप्त होणार? काय म्हणतोय बेकायदेशीर कृतीविरोधी कायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.